ICC : आता गोलंदाजांनाही बसणार टाईम आऊट नियमाचा फटका 

122

आयसीसीने (ICC) २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेटचे नियम बदलले आहेत. खेळाचा वेग वाढवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. आयसीसीने (ICC) गोलंदाजांसाठीही टाईम आऊटसारखे नियम केले आहेत. क्रिकेटची प्रशासकीय संस्था आयसीसीने मंगळवारी सांगितले की, जर गोलंदाजाने डावात तिसऱ्यांदा नवीन षटक सुरू करण्यासाठी ६० सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतला तर गोलंदाजी करणाऱ्या संघावर पाच धावांचा दंड आकारला जाईल. हा नियम सध्या पुरुष क्रिकेटमध्ये वन डे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये लागू असेल.

पाच धावांचा दंड आकारला जाईल

सुरुवातीला हा नियम चाचणीसाठी लागू करण्यात येणार असून त्याची उपयुक्तता आणि परिणाम लक्षात घेऊन तो कायमस्वरूपी लागू करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ते म्हणाले, “सीईसी ने डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत पुरुषांच्या एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये चाचणी आधारावर स्टॉप क्लॉक लागू करण्यास सहमती दर्शवली. षटकांमधील वेळ कमी करण्यासाठी घड्याळाचा वापर केला जाईल. मागील षटक पूर्ण झाल्यानंतर ६० सेकंदांच्या आत गोलंदाजी करणारा संघ पुढील षटक टाकण्यास तयार नसेल आणि हे जर डावात तिसऱ्यांदा घडले तर पाच धावांचा दंड आकारला जाईल, असे आयसीसीने (ICC) एका निवेदनात म्हटले आहे.

(हेही वाचा National Herald : यंग इंडियाची 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; सोनिया-राहुल गांधींची ७६ टक्के भागीदारी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.