BMC : कंत्राट संपल्यानंतरही तब्बल सहा वर्षे एकाच कंपनीकडे महापालिकेची सुरक्षा व्यवस्था

दरवर्षाला सुमारे २४ कोटी रुपयांचा खर्च वाढत हे कंत्राट आता २६२. १५ कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहे.

216
BMC : रविवारी मुंबईत एअर शो, मरीन ड्राईव्हवरील सर्व व्यवस्थेचा भार महापालिकेच्या तिजोरीवर
BMC : रविवारी मुंबईत एअर शो, मरीन ड्राईव्हवरील सर्व व्यवस्थेचा भार महापालिकेच्या तिजोरीवर

महापालिकेच्या रुग्णालयांसह काही महत्वाच्या ठिकाणी १३५० अधिक ३३८ अशाप्रकारे १६८८ एवढ्या खासगी सुरक्षा रक्षकांची तीन वर्षांकरता जुलै २०१४ रोजी नियुक्ती करण्यात आल्यानंतर याचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतरही तारीख पे तारीख याप्रकारे या कंपनीला आजतागायत मुदतवाढ देत त्यांना त्यांना निविदा न देता सहा वर्षांपेक्षा त्यांच्याकडून सेव घेतली जात आहे. त्यामुळे दरवर्षाला सुमारे २४ कोटी रुपयांचा खर्च वाढत हे कंत्राट आता २६२. १५ कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहे. (BMC)

मूळ कंत्राट सुमारे ९४ कोटींचे

मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षक खात्यातील सुरक्षा रक्षकांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त असून ही पदे भरण्याबाबत विलंब करत खासगी सुरक्षा कंपनीला मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरक्षा रक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने महापालिकेने रुग्णालय व काही महत्वाच्या ठिकाणी १३५० सुरक्षा रक्षकांची सेवा खासगी सुरक्षा कंपनीकडून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २०० महिला सुरक्षा रक्षक आणि ११५० पुरुष सुरक्षा रक्षक यांची सन २३ जुलै २०१४मध्ये सेवा घेण्यास मंजुरी मिळाली. त्यामुळे जून २०१७ पर्यंत या कंपनीच्या कंत्राट कामाला मंजुरी दिली होती. यासाठी ईगल सिक्युरिटी अँड पर्सोनल कंपनीला ९४.४१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आले. (BMC)

तब्बल सहा वर्षे मुदतवाढ

परंतु हा कालावधी संपुष्टात आल्यानंतर तेव्हापासून सहा ते नऊ महिने अशाप्रकारे वाढ देत आता ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. आता आणखी जुलै ते ३१ डिसेंबर २०२३पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे. त्यामुळे ३० जून २०२३ पर्यंत दिलेल्या मुदतवाढीमध्ये हा खर्च ९४ कोटी रुपयांवरून २४९. १६ कोटींवर पोहोचले आहे. आता आणखी डिसेंबर २०२३पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्या हा खर्च १२.९९ कोटींनी वाढून एकूण २६२.१५ कोटींवर पोहोचला आहे. (BMC)

एकूण तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या

तसेच सन २०१५-१६मध्ये डॉक्टरांना मारहाण होण्याचे प्रकार वाढल्याने त्या काळात ३०९ अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची मदत घेण्यात आली होती, ही सेवाही पुढे कायम ठेवण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या मुख्य रुग्णालये प्रसुतीगृहे, अग्निशमन केंद्रे. स्मशानभूमी, दवाखाने व इतर महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने, या निविदेचा करार कालावधी सन २०१७मध्ये संपुष्टात आल्यानंतर एकूण तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या, असे सुरक्षा खात्याचे म्हणणे आहे. परंतु पहिल्या वेळेस किमान वेतनाची पूर्तता न झाल्यामुळे निविदा रद्द करण्यात आली, दसऱ्या वेळेस उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्याकारणाने ई-निविदा रद्द करण्यात आली व तिसऱ्यांदा खाजगी मदतनीस नियुक्त करण्याकरिता मागविण्यात आलेली ई-निविदा फेरआढावा घेण्याकरिता व ई-निविदेचे परिमाण विभागून परिमंडळनिहाय ई-निविदा मागविण्याची शक्यता तपासून पाहण्याकरिता रद्द करण्यात आली आहे, असे सुरक्षा विभागाचे म्हणणे आहे. (BMC)

आता परिमंडळ निहाय सुरक्षा रक्षकांची नियुक्ती

या ई-निविदेच्या संख्येबाबत फेर आढावा घेण्यात आलेला असून, सद्यस्थितीत कार्यरत खाजगी मदतनीसांची संख्या ही सन २०१४-१५ मध्ये मागविण्यात आलेल्या निविदेच्या अंतर्गत आहे. परंतु आता अनेक ठिकाणी वाढीव सुरक्षा व्यवस्थेची मागणी करण्यात येत आहे. तसेच नवीन ठिकाणेही निर्माण झालेली आहेत. या सर्व बाबींचा विचार करता, सद्यस्थितीत खाजगी मदतनीसांकरिता एकच निविदा मागविण्याऐवजी परिमंडळनिहाय ई-निविदा मागविण्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. (BMC)

(हेही वाचा – Assembly Elections : निवडणूक असलेल्या 5 राज्यांत दारूचा महापूर; 2018च्या तुलनेत 7 पट जास्त दारू आणि रोख जप्त)

प्रशासन म्हणते, सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी

महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय व डॉ. आर. एन. कुपर रुग्णालय येथे उपकरणांसह खाजगी सुरक्षा व्यवस्था नियुक्त करण्याकरिता महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या अभिप्रायानुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच सद्यस्थितीत सुरक्षा खात्यात सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे चिंताजनक परिस्थिती उद्धभवू शकते. ही सद्यस्थिती लक्षात घेता, सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवणे आवश्यक असल्याने ईगल सिक्युरिटी ऍन्ड पर्सोनल सर्व्हिस यांच्याकडून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत किंवा नवीन ई-निविदेद्वारे सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत ही सेवा घेण्यात येईल असे सुरक्षा खात्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी मंजुरी प्राप्त झाली असली तरी यात काही युनियनच्या आक्षेपामुळे याला विलंब होत असून याचा फायदा खासगी सुरक्षा कंपनीला होत असल्याचे दिसून येत आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.