National Herald : यंग इंडियाची 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; सोनिया-राहुल गांधींची ७६ टक्के भागीदारी

75

नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणात ED ने यंग इंडियाची 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात काँग्रेसशी संबंधित यंग इंडियावर ही कारवाई करण्यात आली. या कंपनीत सोनिया-राहुल यांची 76 टक्के भागीदारी आहे. ईडीने ३ ऑगस्ट २०२२ रोजी हेराल्ड इमारतीत असलेल्या यंग इंडिया कंपनीचे कार्यालय सील करण्यात आले होते.

2 आणि 3 ऑगस्ट रोजी ईडीच्या पथकाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह नॅशनल हेराल्डच्या (National Herald) 16 ठिकाणी छापे टाकले. सोनिया आणि राहुल यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. आता या कारवाई अंतर्गत ईडीने यंग इंडिया कंपनीवर कारवाई केली आहे. .

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरण पहिल्यांदा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये उचलले होते. ऑगस्ट 2014 मध्ये ईडीने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला. या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडीज, सॅम पित्रोडा आणि सुमन दुबे यांना आरोपी करण्यात आले होते.

(हेही वाचा Surat : मुंबईतील २६ हिरे व्यापारी मुंबई सोडून गेले सुरतला)

नॅशनल हेराल्ड (National Herald) वृत्तपत्राची सुरुवात 1938 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्यासह 5 हजार स्वातंत्र्य सैनिकांनी केली होती. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल लिमिटेड (एजेएल) ने प्रकाशित केले होते. स्वातंत्र्यानंतर हे वृत्तपत्र काँग्रेसचे मुखपत्र बनले. 2010 मध्ये, यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड (YIL) नावाची एक नवीन संस्था स्थापन करण्यात आली, ज्याने नॅशनल हेराल्ड चालवणारी AJL ताब्यात घेतली. YIL च्या संचालक मंडळात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा समावेश होता. सोनिया आणि राहुल यांची YIL मधील हिस्सेदारी 76 टक्के होती आणि उर्वरित 24 टक्के मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होती. मोतीलाल व्होरा यांचे 2020 मध्ये आणि ऑस्कर फर्नांडिस यांचे 2021 मध्ये निधन झाले. यानंतर काँग्रेसने AJL चे 90 कोटी रुपयांचे कर्ज YIL ला हस्तांतरित केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.