Gender Pay Equality in Cricket : वेस्ट इंडिजने पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान वेतन देण्याचा केला करार

खेळाडूंच्या असोसिएशनशी अशाप्रकारचा करार करणाचं क्रिकेट वेस्ट इंडिज हे पहिलं क्रिकेट मंडळ आहे. 

172
Gender Pay Equality in Cricket : वेस्ट इंडिजने पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान वेतन देण्याचा केला करार
Gender Pay Equality in Cricket : वेस्ट इंडिजने पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान वेतन देण्याचा केला करार
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेट वेस्ट इंडिजने (West Indies) शुक्रवारी खेळाडूंच्या असोसिएशनशी विविध मुद्यांवर एकत्र करार केला आहे. पण, यातील महत्त्वाचं एक कलम आहे ते म्हणजे पुरुष आणि महिला वेतन समानतेचं. ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२७ पर्यंतच्या कालावधीसाठी केलेल्या या करारात क्रिकेट वेस्ट इंडिजने (West Indies) पुरुष तसंच महिला क्रिकेटपटूंना एकसमान वेतन देण्याचं मान्य केलं आहे. (Gender Pay Equality in Cricket)

आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत क्रिकेटमध्येही वेतन समानता आणण्यात येणार आहे. स्पर्धांमधून क्रिकेट बोर्डाला मिळणाऱ्या पैशापैकी खेळाडूंचा वाटा, कर्णधारा मिळणारा भत्ता आणि इतर अशा सगळ्याच आर्थिक करारांमध्ये ही समानता आणली जाणार आहे. (Gender Pay Equality in Cricket)

(हेही वाचा – Maratha Reservation: ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळणार, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण)

अलीकडच्या काळात भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशातही क्रिकेट मंडळांनी पुरुष, महिला वेतन असमानता कमी करण्यासाठी पावलं उचलली आहेत. गेल्यावर्षीपासून आयसीसीनेही (ICC) आपल्या स्पर्धांसाठी वेतन समानता आणली आहे. आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये मिळणारी बक्षिसाची रक्कम आता पुरुष व महिलांसाठी सारखीच असते. पण, या सगळ्यात वेस्ट इंडिज (West Indies) बोर्डाने संपूर्ण समानता आणून आघाडी घेतली आहे. (Gender Pay Equality in Cricket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.