Devendra Fadanvis : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार का? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

221

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लाखोंच्या संख्येने मराठा समुदाय घेऊन मुंबईच्या वेशीवर धडकले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्याच वेळी मागील तीन महिन्यांत मराठा आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यावर महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिला.

(हेही वाचा Maratha Reservation: ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळणार, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

आंतरवाली सराटीसह राज्यभर विविध ठिकाणी मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. मराठा आंदोलकांवर जिथे-जिथे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतरवाली सराटी असो किंवा इतर ठिकाणचे गुन्हे निश्चितच मागे घेतले जातील. परंतु, घरे जाळल्याची प्रकरणे पोलिसांवर थेट हल्ला, इतर वास्तूंची जाळपोळ करणे, बसेसची जाळपोळ करणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांसंदर्भात आपल्याला (राज्य सरकार) निर्णय घेता येत नाही. न्यायालयाच्या आदेशाशिवाय आपण यामध्ये काहीच करू शकत नाही, आपण ते गुन्हे मागे घेऊ शकत नाही. त्यामुळे ते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. इतर गुन्हे आपण मागे घेत आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.