Kevin Sinclair Cartwheel Celebration : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत केविन सिनक्लेअरचं कार्टव्हिल सेलिब्रेशन

एरवी कार्टव्हील सेलिब्रेशन फुटबॉलमध्ये पहायला मिळतं. 

141
Kevin Sinclair Cartwheel Celebration : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत केविन सिनक्लेअरचं कार्टव्हिल सेलिब्रेशन
Kevin Sinclair Cartwheel Celebration : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत केविन सिनक्लेअरचं कार्टव्हिल सेलिब्रेशन
  • ऋजुता लुकतुके

फुटबॉलच्या मैदानात गोल झाल्यावर खेळाडूचं कार्टव्हील सेलिब्रेशन (Cartwheel Celebration) तसं नेहमीचं आहे. पण, क्रिकेटमध्ये आणि ते ही संथ असा कसोटी सामन्यात ते पाहायला मिळालं तर? ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यानच्या ब्रिस्बेन कसोटीत असं सेलिब्रेशन झालं तेव्हा समालोचक आणि प्रेक्षकही थक्क झाले. (Kevin Sinclair Cartwheel Celebration)

तो क्षण आला जेव्हा ऑफ-ब्रेक गोलंदाजी करणाऱ्या केविन सिनक्लेअरने ऑस्ट्रेलियन सलामीवीर ख्वाजा उस्मानला बाद केलं. सिनक्लेअरच्या उंची दिलेल्या चेंडूवर ख्वाडा ड्राईव्हचा फटका खेळायला गेला. पण, चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट पहिल्या स्लिपमध्ये ॲलिक ॲथनेझच्या हातात विसावला. (Kevin Sinclair Cartwheel Celebration)

नंतर सिनक्लेअरने मैदानावर केलेलं सेलिब्रेशन ऑस्ट्रेलियातही चर्चेचा विषय बनलं आहे. (Kevin Sinclair Cartwheel Celebration)

(हेही वाचा – Tata-Airbus Deal : आता टाटा हेलिकॉप्टरही बनवणार, फ्रान्सच्या ‘या’ कंपनीसोबत केला करार)

ब्रिस्बेन इथं सुरू असलेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज सामना सध्या रंगतदार वळणावर आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३११ धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद २४ आणि नंतर ५ बाद ५४ अशी झाली होती. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने ४९ चेंडूंत ६५ धावा करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ९ बाद २८९ धावांवर घोषित करण्यात आला. आता विंडिज संघाचा दुसरा डाव सुरू आहे. (Kevin Sinclair Cartwheel Celebration)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.