Maratha Reservation : आता आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा; राज ठाकरे यांच्या जरांगेना सूचना

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईच्या वेशीपर्यंत येऊन धडकलेल्या लाखो मराठा आंदोलकांचे राज्य सरकारने अध्यादेश काढून अखेर समाधान केले.याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. तर या ट्विट मध्ये त्यांनी जरांगेचे अभिनंदन तर केले आहे मात्र त्याबरोबर त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

250
Maratha Reservation : आता आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा; राज ठाकरे यांच्या जरांगेना सूचना

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईच्या वेशीपर्यंत येऊन धडकलेल्या लाखो मराठा आंदोलकांचे राज्य सरकारने अध्यादेश काढून अखेर समाधान केले. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी एकच जल्लोष केला. त्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र सगेसोयऱ्यांनाही देण्यात येईल, असे म्हटले आहे. मात्र याच मुद्द्यावरून आता प्रचंड चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. तर या ट्विट मध्ये त्यांनी जरांगेचे अभिनंदन तर केले आहे मात्र त्याबरोबर त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.  (Maratha Reservation)

राज्य सरकारच्या शिष्टमंडळान रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली. जवळपास तीन तास जरांगेंमध्ये चर्चा झाली. यावेळी सुधारित अध्यादेश जरांगेंना देण्यात आला. दरम्यान तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते सुद्धा मुख्यमंत्र्यांना विचारा कधी मिळणार असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारवर थेट वार केला. (Maratha Reservation)

काय म्हणाले राज ठाकरे त्यांच्या ट्वीट मध्ये

श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.