Bihar : इंडी आघाडीला नितीश कुमार यांचा राम राम?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील नितीश कुमार यांची मनधरणी करू शकले नाही, हे महत्वाचं. शिवाय लालू प्रसाद यादव यांच्या राजदला देखील मोठा फटका बसणार आहे. कारण सुषाशनबाबु चा एक निर्णय देशाच्या राजकीय पातळीवर मोठा भूकंप घडवून आणणारा आहे.

222
Bihar : इंडी आघाडीला नितीश कुमार यांचा राम राम?
Bihar : इंडी आघाडीला नितीश कुमार यांचा राम राम?

अगदी खुप उत्साहात विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नितीश कुमार (nitish kumar) यांनीच इंडी आघाडीला (I.N.D.I. Alliance) राम राम केल्यामुळे इंडीचे अस्तित्व संपल्यातच जमा आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील नितीश कुमार यांची मनधरणी करू शकले नाही, हे महत्वाचं. शिवाय लालू प्रसाद यादव यांच्या राजदला देखील मोठा फटका बसणार आहे. कारण सुषाशनबाबु चा एक निर्णय देशाच्या राजकीय पातळीवर मोठा भूकंप घडवून आणणारा आहे. (Bihar)

बिहारमध्ये नितीश-लालू युती तुटली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी १० वाजता ते राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील. यासोबतच ते नवे सरकार स्थापन करण्याचा दावाही करणार आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश (nitish kumar)  राज्यपालांना उद्याच नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यासही सांगतील. दुसरीकडे, शनिवारी सकाळी नितीश कुमार यांनी आरजेडी कोट्यातील मंत्र्यांच्या कामावर बंदी घातली होती. यानंतर राज्याचे कृषिमंत्री कुमार सर्वजीत यांनी सरकारी वाहन परत केले. (Bihar)

(हेही वाचा – Sports Mahakumbh : मुंबईत १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार क्रीडाकुंभ)

दरम्यान, दिल्लीहून पाटणा येथे पोहोचलेले भाजपचे राज्यसभा खासदार राकेश सिंह यांनी मोदींचे सुशासन जगाने पाहिले आहे, असे म्हटले आहे. आता बिहारच्या जनतेलाही मोदींचे सुशासन पाहायचे आहे. दरम्यान, बिहारमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नितीश एनडीएमध्ये सामील झाल्याची बातमी समोर आल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना अनेकदा फोन केला, मात्र संवाद होऊ शकला नाही. मुख्यमंत्री सध्या व्यस्त असल्याचे त्यांना सीएम हाऊसकडून सांगण्यात आले. बिहारमध्ये नितीश यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले- नितीश हे इंडी आघाडी सोडताहेत, मला त्याबद्दल माहिती नाही. मी उद्या दिल्लीला जाणार आहे, तिथे माहिती घेईन. (Bihar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.