Cricket in Olympics : क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशात विराट कोहलीचंही योगदान 

क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीची ओळख किंग कोहली अशी आहेच. शिवाय क्रिकेट न खेळणाऱ्या देशांतही तो लोकप्रिय आहे. त्याची ही प्रतिमा क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशासाठी कशी उपयोगी पडली ते बघूया 

89
Cricket in Olympics : क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशात विराट कोहलीचंही योगदान 
Cricket in Olympics : क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशात विराट कोहलीचंही योगदान 

ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावाची जादू क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये तर चालतेच. शिवाय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक (Cricket in Olympics) परिषदेच्या मुंबईत झालेल्या वार्षिक बैठकीतही विराटच्या नावाची चर्चा झाली. इतकंच नाही तर क्रिकेटच्या ऑलिम्पिकमध्ये समावेशासाठी विराटची जागतिक प्रतिमा उपयोगी पडली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर २५,००० पेक्षा जास्त धावा आहेत. ७७ शतकं त्याच्या नावावर आहेत. आणि क्रिकेटपटू म्हणून संघाचा कर्णधार म्हणून अनेक संस्मरणीय क्षण त्याने जगाला दिले आहेत. त्यामुळे त्याची लोकप्रियताही अफाट आहे.

विराटच्या या लोकप्रियतेचा उल्लेख लॉस एंजलिस ऑलिम्पिक (Cricket in Olympics) खेळांच्या आयोजन समितीचे क्रीडाविषयक अध्यक्ष निकोलो कँप्रियानी यांनी गौरवाने केला. ‘माझा मित्र विराट कोहलीचे सोशल मीडियावर ३४० दशलक्षांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. क्रीडा जगतातील तो तिसरा मोठा सोशल मीडिया स्टार आहे. अशा क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिक २०२८ मध्ये झाला तर आमच्यासाठी ही विन-विन सिच्युएशन आहे. क्रिकेटलाही विस्ताराची संधी मिळेल,’ असं कँप्रियानी बैठकीत बोलताना म्हणाले.

विराटचा आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लगेच विराटविषयी एक ट्विट करून ही माहिती सर्वांना दिली. विराट फक्त भारताचाच क्रिकेट आयकॉन नसून जगाचा आयकॉन बनला आहे, असं त्यांनी म्हटलंय.

१२८ वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग असणार आहे. यंदा कसोटी नाही तर टी-२० क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये खेळवलं जाईल. २०१८ मध्ये विराट कोहली ३९ वर्षांचा असेल. त्यामुळे या ऑलिम्पिकमध्ये तो खेळू शकेल का हा प्रश्नच आहे. पण, त्याच्या लोकप्रियतेचा असाही फायदा क्रिकेटला झाला आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ऑलिम्पिक समावेशानंतर ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.