Ronaldinho : रोनाल्डिनो जेव्हा दुर्गा पूजेच्या मंडपात अवतरतो… 

आपल्या दोन दिवसांच्या कोलकाता भेटीत रोनाल्डिनोने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेतली. आणि दुर्गापूजेच्या एका कार्यक्रमातही तो सहभागी झाला

101
Ronaldinho : रोनाल्डिनो जेव्हा दुर्गा पूजेच्या मंडपात अवतरतो… 
Ronaldinho : रोनाल्डिनो जेव्हा दुर्गा पूजेच्या मंडपात अवतरतो… 

ऋजुता लुकतुके

ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रविवारी कोलकातामध्ये आपल्या दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी दाखल झाला. आणि त्यानंतर त्याने लगेचच श्रीभूमी दुर्गापूजा मंडपात हजेरी लावली. कोलकाता शहरात सध्या नवरात्रीची धूम सुरू आहे. रोनाल्डिनो (Ronaldinho) दुर्गापूजेच्या मंडपात आला त्याचा एक व्हीडिओ एएनआय वृत्तसंस्थेनं ट्विट केला आहे.

रोनाल्डिनो कोलकाता विमानतळावर उतरला तेव्हा शेकडो कोलकाता वासीयांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. कोलकाता शहर फुटबॉलप्रेमींचं शहर म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. शिवाय इथं ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाचेही चाहते आहेत. यापूर्वी लियोनेल मेस्सी, दिएगो मॅऱादोना आणि पेले असे दिग्गज फुटबॉलपटूही कोलकात्याला आलेले आहेत.

रोनाल्डिनो हा २००२ च्या विश्वचषक विजेत्या ब्राझीलं संघाचा भाग होता. आणि २००४, २००५ साली तो फिफाचा वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरला होता. बार्सिलोना संघाकडून २००७ मध्ये तो चॅम्पियन्स लीगही जिंकला होता.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.