भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही

127

भारत आणि चीनमध्ये 18 नोव्हेंबर 1962 ला रेजांग ला येथे झालेल्या युद्धात भारतातील अनेक सैनिक हुतात्मा झाले. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या युद्धस्मारकाच्या उद्घाटनासाठी गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पोहोचले होते. चीनी सैनिकांची संख्या जास्त होती. पण, भारतीय सैनिकांनी त्यांना एक इंचही भारताच्या भूमीवर घुसू दिले नाही.

मी येथे कायम येत राहणार 

आपल्या सैनिकांच्या या पराक्रमाचे कौतुक करताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, आपल्या शत्रू राष्ट्रांना कडक शब्दांत संदेश दिला आहे. भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही. भारत आता एक कमजोर देश राहिलेला नाही. आम्ही प्रगत तंत्रज्ञानासहित देशाचे रक्षण करत आहोत. भारताच्या एक एक इंच जमिनीसाठी आम्ही कायम लढू. भारताचा त्याच्या सैनिकांवर पूर्ण विश्वास आहे.  भारताच्या या शौर्याच्या अमरगाथेला मी साद देत राहीन. मी येथे कायम येत राहीन.  देश हे बलिदान कधीही विसरणार नाही. असं यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

देश हे बलिदान विसरणार नाही

1962 च्या भारत चीन युद्धात महत्त्वाची भूमीका बजावणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांना यावेळी राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली. 59 वर्षांआधी झालेल्या या लढाईत 114 जवान हुतात्मा झाले होते. तसेच देश हे बलिदान विसरणार नाही. असंही संरक्षण मंत्री पुढे म्हणाले.

  ( हेही वाचा : न्यूझीलंंडची आगामी विश्वचषकातून माघार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.