भंडा-यात गोसेखुर्द धरणाच्या कालव्यात दोन तरुण वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला

99

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात नागपुरातील दोन तरुण वाहून गेल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी इथे घडली आहे. आंघोळीसाठी कालव्यात उतरले असता एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला. तर दुस-या तरुणाचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे तरुण बुडण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

नईम लाल खान आणि अमिन लाल शहा, (राहणार अब्बुमियानगर, भांडेवाडी, नागपूर) अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोन्ही तरुण गावोगावी जाऊन कापड विक्रीचा व्यवसाय करतात. हे दोघे मूळचे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथले रहिवासी असून मागील काही दिवसांपासून कापड व्यवसायाच्या निमित्ताने ते नागपुरात राहत होते.

( हेही वाचा: अमरावतीत लव्ह जिहाद, धर्मांध मुसलमानाने फसवले उच्चभ्रू हिंदू कुटुंबातील तरुणीला )

अशी आहे संपूर्ण घटना

एका व्हॅनने चार तरुण पवनी इथे कापड विक्रीसाठी आले होते. त्यापैकी दोन तरुणांना आंघोळीसाठी पाण्यात उतरण्याचा मोह झाला. नईम खान आणि अमिन शाह हे निलज मार्गावरील गोसेखुर्द उजव्या कालव्यात आंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र यापैकी एक जण पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा तरुण गेला. मात्र, कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने, दोघेही वाहून गेले. हा प्रकार व्हॅनमध्ये बसून असेलल्या त्यांच्या दोन साथीदारांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ पवनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटेनेची माहिती मिळताच पवनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि शोध सुरु केला. परंतु तोपर्यंत उशिर झाला होता. दोन तरुणांपैकी एकाचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला तर दुस-याचा शोध अद्याप सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.