दिलासादायक बातमी: LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात; असे आहेत नवे दर

93

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. LPG गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. एलपीजी गॅसचे दर प्रति सिलिंडर 100 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र ही कपात केवळ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्याच दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्याच्या किमती स्थिर आहेत.

गॅस सिलेंडरचे नवे दर

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर जवळपास 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता राजधीनी दिल्लीमध्ये एलपीजी गॅसचा दर प्रति सिलेंडर 1885 एवढा झाला आहे. तो पूर्वी 1976.50 रुपये एवढा होता. कोलकातामध्ये घसरणीनंतर गॅस सिलेंडरचे दर 1995.5 रुपयांवर पोहोचले आहेत. पूर्वी ते 2092 रुपये इतके होते. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये नव्या दरानुसार एका व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी आता 1844 रुपये मोजावे लागणार आहेत.

( हेही वाचा: भंडा-यात गोसेखुर्द धरणाच्या कालव्यात दोन तरुण वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.