Subhash Ghai: ‘कालिचरन’ ते ‘ताल’ …बॉलिवूडला वेगळ्या उंचीवर नेणारे फिल्ममेकर !

८० आणि ९०च्या दशकात ते हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख आणि सर्वात यशस्वी चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते.

121
Subhash Ghai: 'कालिचरन' ते 'ताल' ...बॉलिवूडला वेगळ्या उंचीवर नेणारे फिल्ममेकर !
Subhash Ghai: 'कालिचरन' ते 'ताल' ...बॉलिवूडला वेगळ्या उंचीवर नेणारे फिल्ममेकर !

सुभाष घई (Subhash Ghai) हे हिंदी सिनेसृष्टीत आदराने घेतलं जाणारं नाव. त्यांनी केवळ सुपरहिट चित्रपट दिले नाहीत, तर त्यांचे चित्रपट म्हणजे उत्तम कलाकृतीसुद्धा आहे. त्यांनी आराधना चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती, तेव्हा कोणालाही वाटलं असणार की, ते पुढे जाऊन खूप मोठे फिल्ममेकर होतील.

सुभाष घई यांचा जन्म २४ जानेवारी १९४५ रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे वडील दिल्लीत डेंटिस्ट होते. हरियाणातील रोहतकमधून त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली आणि त्यानंतर ते पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून सिनेमात पदवी प्राप्त केली. १९६७ साली तकदीर आणि १९६९ मध्ये आराधना या चित्रपटात त्यांनी लहानशी भूमिका साकारली. १९७० मध्ये आलेल्या उमंग आणि गुमहार चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिकादेखील केल्या.

(हेही वाचा – Uddhav Thackeray यांचा भगवा सदरा आणि गळ्यातील रुद्राक्ष हे ‘इंडी’ आघाडीला मान्य असेल का?)

१९७६ मध्ये आलेला कलिचरनहा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. यामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी काम केले होते आणि सिन्हा यांनी घई यांच्या दिग्दर्शनाची स्तुती केली. ८० आणि ९०च्या दशकात ते हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख आणि सर्वात यशस्वी चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते. कालीचरण, विश्वनाथ, कर्ज, हिरो, विधाता, मेरी जंग, कर्मा, राम लखन, सौदागर, खलनायक, परदेस, ताल हे त्यांचे चित्रपट पुष्कळ गाजले. आजही हे चित्रपट वारंवार पाहिले जातात.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला
मुक्ता आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना त्यांनी १९८२ मध्ये केली. इक्बाल चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी त्यांनी मुंबईत व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल फिल्म ऍंड मीडिया इंस्टिट्युट संस्था स्थापन केली. त्यांनी दिलेल्या योगदानासाठी २०१५ मध्ये त्यांना आयफा पुरस्कार मिळाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.