विमानात आढळला साप अन् प्रवाशांमध्ये खळबळ! नेमके घडले तरी काय? DGCA ने दिले चौकशीचे आदेश

116

एअर इंडियाचे विमान शनिवारी केरळहून दुबईला पोहोचले. यादरम्यान विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप बसलेले येथील कर्मचाऱ्यांना आढळला. मात्र या विमानात उपस्थित असलेल्या कोणत्याही प्रवाशाला यामुळे हानी झाली नसल्याचे विमान प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. साप पाहिल्यानंतर विमान कर्मचाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर डीजीसीएने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

( हेही वाचा : राज्यातील गोवरबाधितांची संख्या ९५१ वर; टास्क फोर्सने घेतला ‘हा’ निर्णय )

साप पाहून प्रवाशांमध्ये खळबळ 

विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे सामान काढण्यासाठी कार्गो होल्ड ओपन केला होता यावेळी येथील कर्मचाऱ्यांना साप दिसला यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. कर्मचाऱ्यांना प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. यानंतर संबंधित यंत्रणेला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेविषयी कळवण्यात आले. आता डीजीपीएने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याची चर्चा एअर इंडियात आहे.

New Project 9 3

हे विमान केरळवरून दुबईला निघाले होते. सध्या यामागे ग्राऊंड लेव्हलवर झालेली चूक कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. या प्रकरणाची चौकशी होईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल असे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.