राज्यातील गोवरबाधितांची संख्या ९५१ वर; टास्क फोर्सने घेतला ‘हा’ निर्णय

113

राज्यात गोवरची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता ९५१ वर पोहोचली आहे. गोवरबाधितांमध्ये लहान मुलांचे प्रमाण मोठ्या संख्येने आहे. शिवाय कोरोनाकाळात गोवर-रुबेला लसीकरणात मोठा खंड पडल्याने राज्यात गोवरची साथ आल्याचे मत गोवर टास्क फोर्सकडून व्यक्त करण्यात आले आहे. लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आणि गोवर रुबेला लसीकरणाविषयी पालिका संस्थांना व संबंधित अधिका-यांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय गोवर टास्क फोर्सने घेतला आहे. याकरिता १४ डिसेंबरला ऑनलाईन माध्यमातून टास्क फोर्सचे सदस्य अधिका-यांना मार्गदर्शन करतील.

( हेही वाचा : धक्कादायक! प्रवासी कारमध्ये महिलेचा विनयभंग; १० महिन्यांच्या चिमुकलीसह धावत्या गाडीतून मारली उडी, मुलीचा मृत्यू )

लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना तातडीने लस देण्यात येणार आहे. त्यासाठी दोन टप्प्यात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिम राज्यभरात सुरु केली जाईल. गोवर -रुबेला विशेष लसीकरणाचा पहिला टप्पा गुरुवारी १५ डिसेंबरपासून सुरु होत आहे. राज्यभरात ही मोहीम मोठ्या स्तरावर पहिल्यांदाच राबवली जाणार आहे. दहा दिवसांच्या लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी खास ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. लसीकरणाच्या माध्यमातून गोवर आटोक्यात आणण्यासाठी पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा पुढच्या वर्षी सुरु होईल. १५ जानेवारीपासून गोवर रुबेला विशेष लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होईल. १५ जानेवारी ते २५ जानेवारीमध्ये लसीकरणाची दुसरी मात्रा या मुलांना दिली जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.