शासन आपल्या दारी : गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी आजच करा अर्ज

उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने अर्जदार प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती.

153
शासन आपल्या दारी : गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी आजच करा अर्ज

‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dari) या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोकण विभागासाठीच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शामराव पेजे कोकण तर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेची माहिती देण्यात येत आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय करावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना :-

महामंडळाच्या निष्कर्षानुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांचे बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत), (LLP, FPO) अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणीसाठी जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि १५.०० लाख रु. मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. इतर कोणतेही शुल्क महामंडळ अदा करणार नाही. गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील. गटातील लाभार्थ्यांचे किमान वय १८ ते ४५ वर्षे असावे. गटातील उमेदवाराने अर्ज करते वेळी या प्रकल्पांसाठी व यापूर्वी महामंडळाच्या वा इतर महामंडळांच्या कोणत्याही योजनांचा वैयक्तिक लाभ घेतलेला नसावा. गटांच्या भागीदारांचे किमान रु. ५०० कोटीच्या वर ठेवी असलेल्या व कोअर बँकींग सिस्टम असलेल्या राष्ट्रीयकृत/शेड्युल बँक खाते असावे. गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडीट स्कोअर किमान ५०० इतका असावा. गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेब पोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

अर्जदार लाभार्थीची अर्हता :-

लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असावा. तो कोणत्याही बँकेचा महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. बीज भांडवल योजना व थेट कर्ज योजनेकरिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.१,००,०००/- पेक्षा कमी असावे. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभा घेता येईल. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

अर्जासोबत जोडावाच्या कागदपत्रांचा तपशिल :-

उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने अर्जदार प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती. जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला. २ जामिनदारांची हमीपत्र अथवा गहाणखत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ना हरकत प्रमाणपत्र” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे. त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र. तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने/लायसन्स, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादींचे दरपत्रक, महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी निर्देशित केल्यानुसार इतर कागदपत्रांचा तपशिल, अर्जदाराने मूळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

या योजनांच्या अधिक माहितीसाठी अर्जदारांनी ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत येथे अथवा 8879945080 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.