मोटू-पतलू कार्टुन्स पात्रांना जन्म देणारे Harvinder Mankar

276

हरविंदर मानकर (Harvinder Mankar) हे भारतीय व्यंगचित्रकार, चित्रकार, पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. लोटपोट मासिकात प्रकाशित झालेल्या मोटू पतलू या कॉमिक मालिकेतील पात्रे त्यांनी निर्माण केली आहेत. त्यांची ही ३डी ॲनिमेटेड टेलिव्हिजन मालिका निकेलोडियनवर प्रसारित होत आहे. त्यांनी जवळपास २२,००० पॉकेट कार्टून, कॉमिक स्ट्रिप्स, शैक्षणिक पुस्तके आणि कथा अशा पुस्तकांचे चित्रण केले आहे.

हरविंदर मानकर (Harvinder Mankar) यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९६४ रोजी दिल्लीत एका पंजाबी हिंदू राजपूत कुटुंबात झाला. केवळ १६ वर्षांचे असतानाच त्यांनी चित्रे आणि रेखाचित्रे तयार करण्यास सुरुवात केली. ते जमिनीवर आणि भिंतींवर कोळशाच्या तुकड्यांपासून चेहरे आणि चित्रे रेखाटत असत आणि हळूहळू कोळशाची जागा ब्रश आणि शाईच्या पेनने घेतली.

(हेही वाचा मतदानाचा टक्का वाढला; PM Narendra Modi यांनी मानले आभार; म्हणाले…)

त्यांचे पहिले कार्टून मधु मुस्कान मासिकात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर त्यांची व्यंगचित्रे लोट पोट, बाल भारती, नंदन, चंपक, बालमन, छोना आणि इतर अनेक मासिकांतून प्रसिद्ध झाली. नूतन चित्रकथेत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या भूतनाथ, मामाजी आणि अमर-अकबर या पात्रांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. चटकू-मटकू, चुटकी, नटखट नीतू आणि जांबाज देवा ही त्यांची इतर पात्रेही खूप गाजली. १९८० मध्ये, त्यांनी मोटू पतलू ही कॉमिक मालिका सुरू केली. यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.

आता ते आर्ट स्टुडिओ कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच, तो लोट पोट मासिकासाठी क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि मुख्य इलस्ट्रेटर म्हणून काम करत आहेत. मायापुरी या चित्रपट मासिकाचे संपादकीय संचालक देखील आहेत. पटकथा-लेखक म्हणून त्यांचा पहिला शो मायापुरी इलु इलू हा एटीएन टीव्हीवर प्रसारित झाला. त्यानंतर, त्यांनी दूरदर्शन, पीटीसी पंजाबी, जयपूर टीव्ही, ईटीव्ही उर्दू आणि इतर अनेक चॅनेलवर प्रसारित झालेल्या अनेक काल्पनिक आणि चित्रपट-आधारित कार्यक्रमांचे लेखन केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.