उद्धव ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणुकीत ५०च्या पुढे जाणार नाही – आशिष शेलार

16
उद्धव ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणुकीत ५०च्या पुढे जाणार नाही - आशिष शेलार
उद्धव ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणुकीत ५०च्या पुढे जाणार नाही - आशिष शेलार

गेल्या २५ वर्षांत मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता; कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धवजींची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० चा आकडाही पार करू शकणार नाही, अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली.

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवारी दादर वसंत स्मृती येथे संपन्न झाली. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पुनम महाजन, खासदार मनोज कोटक, महामंत्री संजय उपाध्याय, आमदार अमित साटम, आमदार योगेश सागर, आमदार सुनील राणे, आमदार पराग अळवणी, आमदार कालिदास कोळंबकर आमदार मनीषाताई चौधरी, आमदार भारती लव्हेकर, आमदार विद्या ठाकूर, आमदार राजहंस सिंह, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, जयप्रकाश ठाकूर, चित्राताई वाघ, माजी खासदार किरीट सोमय्या, सुनील कर्जतकर, केशव उपाध्ये, गटनेते प्रभाकर शिंदे, राज पुरोहित, मधू चव्हाण आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – Ashish Shelar : काय होतास तू, काय झालास तू; उद्धव ठाकरेंना आशिष शेलार असे का म्हणाले?)

शेलार म्हणाले, मुंबई शहरातील आमच्यावर टीका करणारे काहीजण म्हणायचे कधीतरी लोकाचे ऐका मन की बात लोगो की सूनो… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात मुंबई शहरात दहा हजार ठिकाणी ऐकली गेली. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा प्रवास दौरा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. आमचं अन्य पक्षांना आव्हान आहे की, भाजपाच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेला दहा हजार संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले. गरजू महिलांना तसेच २७ हजार कुटुंबांना मदत करण्यात आली. सलग १५ दिवसांत ९ मोठे कार्यक्रम अन्य कुठल्या पक्षाला जमू शकत नाहीत तेवढे आपण केले.

नरेंद्र मोदी देशाला लाभलेले दुर्लभ नेतृत्व

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. विरोधकांच्या पोटात दुखते. त्यांना त्रास होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन मोदींना म्हणातात, तुम्ही चांगली लोकशाही राबवत आहात. आपण पुढच्या महिन्यात भोजनासाठी वॉशिंग्टनमध्ये भेटत आहोत. अमेरिकेतील उच्च वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत. हे दुर्लभ नेतृत्व आपल्याला मिळाले आहे, असेही शेलार म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.