Ashish Shelar : काय होतास तू, काय झालास तू; उद्धव ठाकरेंना आशिष शेलार असे का म्हणाले?

मुंबईतील मतदारांनी उद्धवजींचे नेतृत्व अनेकवेळा नाकारले आहे, असे आशिष शेलार म्हणाले.

30

भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते मुंबई भाजपच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांची मोठी खुर्ची होती, तर उद्धव ठाकरे मात्र सोप्यावर बसलेले होते, असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना देखील इशारा दिला आहे.

काय म्हणाले आशिष शेलार?

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला. ‘महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांची मोठी खुर्ची होती, तर उद्धव ठाकरे मात्र सोप्यावर बसलेले होते. तेव्हा मला ते गाणे आठवले ‘कोण होतास तू काय झालास तू’, आमच्यासोबत होतात तेव्हा शिवतीर्थवर तुमची सभा गाजायची. आमच्यासोबत होता तेव्हा तुमच्या घरी सर्व नेते यायचे अन् आज तुम्हाला दारोदारी जावं लागते, असा हल्लाबोल शेलार यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईतील मतदारांनी उद्धवजींचे नेतृत्व अनेकवेळा नाकारले आहे. आम्ही तुम्हाला हिंदुत्वामुळे पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेत अनेकवेळा शिवसेनेची घसरण झाली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महापालिकेत पन्नासचा आकडाही पूर्ण करणार नाही, असे शेलार यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा The Kerala Story : चित्रपटाच्या प्रदर्शनावरून पुण्यातील FTII मधील विद्यार्थ्यांमध्ये वाद; शो बंद करण्याची मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.