Ashish Shelar : भाजपाच्या झेंड्यावर गाय कापणाऱ्यांशी उद्धव ठाकरेंची सलगी – आशिष शेलार

आम्हाला (Ashish Shelar) पराभव मान्य आहे. त्याचे विश्लेषण करू.

31
Ashish Shelar : भाजपाच्या झेंड्यावर गाय कापणाऱ्यांशी उद्धव ठाकरेंची सलगी - आशिष शेलार

भाजपा पराभूत झालं, (Ashish Shelar) यश मिळालं नाही; तर नंगानाच आणि त्याबरोबर समाजविदारक कृत्यांची व्हिडिओ क्लिप काढण्यात आली. त्याचा आनंद कर्नाटकात साजरा केला. भाजपच्या झेंड्यावर गाय कशी कापली हे त्यात दाखविण्यात येत आहे. गाय कापून भाजपच्या झेंड्यावर तुम्ही उन्माद साजरा करणार असाल आणि त्या काँग्रेसबरोबर उद्धवजी तुम्ही बसणार असाल, तर तुमचा निषेध करावा तेवढा कमी आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली.

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या (Ashish Shelar) सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवार २१ मे रोजी दादर वसंत स्मृती येथे पार पडली. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर, खा. गोपाळ शेट्टी, खा. पुनम महाजन, खा. मनोज कोटक, यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Ajit Pawar : महाविकास आघाडीतही मोठा भाऊ – छोटा भाऊ वाद सुरू; काय म्हणतात अजित पवार?)

शेलार (Ashish Shelar) म्हणाले, एका बाजूला मानवतामूल्य, प्राण्यांचं महत्त्व, पर्यावरणाचे महत्त्व आणि डोंबलाचा आरे वाचवला सांगता, उद्या तुमची सत्ता महानगरपालिकेत आली, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आली तर भाजपला विरोध करण्यासाठी त्या आरे जंगलामधील म्हशी आणि गाई कापायलाही तुम्ही कमी करणार आहात का? हा मुंबईकरांच्या मनातला प्रश्न आहे. आपणाला या सर्व गोष्टींचा सामना प्रामाणिकपणे काम करून करायचा आहे. आपल्याला खोलवर जाऊन काम करणं मा. मोदींच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं लाभार्थ्यांशी संपर्क करणं, ‘नौ साल बेमिसाल’ मोदीजींच्या जनसंपर्क अभियानात केंद्र सरकारचे सर्व विषय पोहोचवणं गरजेचे आहे. केवळ मतदारांच्या अधिकारांसाठी नाही तर प्राणीमात्रांच्या जगण्याच्या अधिकारांसाठीसुद्धा तुम्हाला आणि मला लढावं लागेल, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही बंद खोलीत स्वतःशी बोलणारे नव्हे!

टीका करणाऱ्यांचे स्वागत आहे. प्रत्येक टीकेतून आम्ही (Ashish Shelar) शिकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही बंद खोलीतून स्वतःच्या मनाशी स्वतः बोलणारे नाही आहोत. आम्ही खुल्या जनतेत बोलणारे नेतृत्व आहोत आणि म्हणून कर्नाटकचे निकाल लागले त्यानंतर ज्यांची बोलती इतके दिवस बंद होती, ते आता लगेच बोलू लागले. हे खरं आहे की, आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. आम्हाला सत्ता मिळाली नाही. हेही विनम्रतेने सांगू आणि त्याचे आत्मचिंतन आणि परीक्षण करणे आमचं कर्तव्य आहे.

हेही पहा – 

त्यामध्ये आम्ही (Ashish Shelar) मतदाराने दिलेल्या कौलाचा संपूर्ण विनम्रतेने स्वीकार करून त्याचे विश्लेषण करू. निकालाच्या विश्लेषणाचे काम राष्ट्रीय स्तरावर होईल. पोपटपंची करणारे पोपट बोलायला लागल्यावर मी, मुद्दाम आकडेवारीची माहिती घेतली. त्याठिकाणी एक हजाराच्या खाली जागा गेल्या अशा पाच जागा आहेत.

तीन जागा अशा आहेत ज्या दोन हजार मतांनी गेल्या, बावीस जागा अशा आहेत ज्या पाच हजाराच्या आत अंतराने गेल्या आहेत. सहा सात हजाराच्या अंतराने गेल्या अशा सोळा जागा आहेत, या सगळ्याची गोळा बेरीज केली तर ४७ होते. या ४५ जागा इथून तिथे झाल्या असत्या तर ८५ वर काँग्रेस आणि ११० वर भाजपा गेली असती. आम्हाला (Ashish Shelar) पराभव मान्य आहे. त्याचे विश्लेषण करू.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.