ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन

118

वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांचं आज सकाळी निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. फक्त साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली, त्यांच्या लेखणीतून, पुस्तकाद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचलं. डॉ अनिल अवचट यांच्या पार्थिवावर दुपारी 2 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

(हेही वाचा – कचरा कुंडी बनलेले ‘ते’ पुरातन प्याऊ पुन्हा दादरकरांची तहान भागवणार!)

अनिल अवचट यांच्याबद्दल…

  • अनिल अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूरमध्ये झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवीही पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली.
  • महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. अनिल अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत, त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांमधून दिसून येतं.
  • 1969 साली त्यांचं पहिलं-वहिलं पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध झालं.
  • त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं असून आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
  • अनिल अवचट यांच्या लेखनाची शैली अत्यंत वास्तववादी होती. त्यांच्या या लेखन शैलीमुळे ते अधिक लोकप्रिय ठरले.

व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावे, यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली होती. अवचट हे एक डॉक्टर होते, मात्र त्यांनी समाजसेवेतही मोलाचे योगदान दिले. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केले होते, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

डॉ. अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर ते एक कलाकारही होते. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते. अवचट यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार तसंच त्यांना महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा (२०२१) मसाप जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.

असा झाला व्यसनमुक्ती केंद्राचा जन्म

डॉ. अनिल अवचट यांचं समाजकार्यही तितकंच उल्लेखनीय आहे. सामाजिक कार्याचा भाग म्हणून व्यसनमुक्तीसाठी त्यांची मुक्तांगण ही संस्था कार्यरत होती. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची एक अनोखी पद्धत शोधली. जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये त्यांची ही तकनिक वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.