युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी भारत चिंतेत! रशिया-युक्रेनमध्ये युद्ध होणार?

97

रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया युक्रेनवर हल्ला करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. रशियासोबतचा तणाव वाढतच चालल्याने युक्रेनमधील भारतीय दुतावासाने युक्रेनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जलद गतीने माहिती प्रसारित करण्यासाठी स्वतःची नोंदणी करण्यास सांगितले आहे.

भारतीय नागरिकांना आवाहन

भारतीय दूतावासाने सांगितले की, ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच दिलेल्या वेबसाइटवर नावाची नोंदणी करण्याचे आवाहन  भारतीय नागरिकांना करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांशी प्रभावीपणे समन्वय साधण्याच्या आणि जलद गतीने माहिती प्रसारित करण्याच्या उद्देशाने, भारतीय दूतावास, सध्या युक्रेनच्या प्रदेशात असलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना  फॉर्म भरण्याची विनंती करत आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दूतावासाची वेबसाइट, फेसबुक आणि ट्विटर पेज फॉलो करण्याचा सल्ला युक्रेनमधील भारतीय नागरिकांना दुतावासाकडून देण्यात आला आहे.

भारताने भूमिका मांडावी

व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी यांनी सांगितले की, “आम्ही निश्चितपणे तणाव कमी करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांचे स्वागत करतो आणि यासाठी भारताच्या भूमिकेचे स्वागत करतो असे अमेरिकेने सांगितले आहे. रशिया आणि युक्रेन या संघर्षात भारताने आपली भूमिका मांडावी असे अमेरिकेचे मत आहे.

( हेही वाचा: ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन )

रशियाने दावा फेटाळला

स्पुतनिकने वृत्त दिले की रशिया, तसेच नाटो सैन्याने एकमेकांकडून आक्रमक कारवाईच्या भीतीने या प्रदेशात सैन्य जमा केले आहे. युनायटेड स्टेट्स आणि युक्रेनने रशियावर आक्रमण करण्याची तयारी केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मॉस्कोने हे दावे फेटाळून लावले असून, कोणत्याही देशावर हल्ला करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही, असे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.