Ayodhya Ram mandir : राममंदिर – पतित पावन मंदिराचे व्यापक स्वरूप, सामाजिक समरसतेचे प्रतीक

Ayodhya Ram mandir : स्वा. सावरकरांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिराची (Ratnagiri) स्थापना केली होती. अयोध्येत स्थापन होणारे राममंदिर म्हणजे या पतित पावन मंदिराचे व्यापक स्वरूप आहे.

106
Ayodhya Ram mandir : राममंदिर - पतित पावन मंदिराचे व्यापक स्वरूप, सामाजिक समरसतेचे प्रतीक
Ayodhya Ram mandir : राममंदिर - पतित पावन मंदिराचे व्यापक स्वरूप, सामाजिक समरसतेचे प्रतीक

जयेश शत्रुघ्न मेस्त्री

प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि देशामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. राममंदिराचा लढा खूपच जुना आहे. (Ayodhya Ram mandir) स्वातंत्र्यपूर्व काळात देशस्वातंत्र्याचा लढा सुरु असताना देखील रामजन्मभूमीचा समांतर लढा सुरुच होता. १८५३ मध्ये निर्मोही आखाड्याच्या साधूंनी रामजन्मभूमीवर आपले स्वामित्व असल्याचा दावा केला होता. १८५५ मध्ये प्रशासनाने या ठिकाणाचे दोन भागांत विभाजन केले. पुढे हे प्रकरण १८८५ मध्ये कोर्टात गेले. मात्र मंदिर बनवण्याची परवानगी देण्यात आली नाही. (Rammandir Pran Pratishtha)

(हेही वाचा – BJP : मित्र पक्ष भाजपसाठी जागांचा त्याग करणार?)

१९४९ मध्ये हिंदू महासभेद्वारे (Hindu Mahasabha) रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली आणि त्या मूर्तीचे पूजन सुरु झाले. १९५० रोजी गोपाल सिंह विशारद यांनी स्वतंत्र भारतातील सर्वांत पहिला खटला दाखल केला होता. ते उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्याचे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. १९८६ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. आज त्यांच्या मृत्यूनंतर ३८ वर्षांनी त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. गोपाल सिंह विशारद यांनी या लढ्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त करून दिले. २०१९ ला रामजन्मभूमीसंबंधी कोर्टाचा निकाल आला आणि हिंदूंचा आनंद गगनात मावेनासा झाला.

(हेही वाचा – BMC : शहराच्या पालकमंत्र्यांकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धरले जाते वेठीस)

राम हे असं दैवत आहे, जे आपल्याला भौगोलिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या जोडून ठेवतं. रामजन्मभूमी आंदोलन (Ram Janmabhoomi Movement) ते राम मंदिराच्या निर्माणामध्ये सर्व स्तरातील, सर्व घटकातील लोकांनी सहभाग घेतला आहे. राम हा शाकाहार-मांसाहार या पलीकडे आहे. अध्यात्मिकदृष्ट्या देखील इतर कोणत्याही संप्रदायाची दीक्षा घेतली नसली, तरी राम नाम जपणे हे अतिशय सोपे आहे. रामाचे नाव घ्यायला भक्तावर कोणतेच बंधन नसते. म्हणूनच आपल्याला राममंदिराकडे या दृष्टीकोनातून पाहावे लागणार आहे. स्वा. सावरकरांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिराची (Ratnagiri) स्थापना केली होती. अयोध्येत स्थापन होणारे राममंदिर म्हणजे या पतित पावन मंदिराचे व्यापक स्वरूप आहे. ते सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे. आता हिंदू यापुढे जातीत, संप्रदायात, पंथांमध्ये, विचारांमध्ये विभागला जाणार नाही. राम या दोन अक्षरांमुळे तो जोडला जाणार आहे. (Ayodhya Ram mandir )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.