BJP : मित्र पक्ष भाजपसाठी जागांचा त्याग करणार?

BJP : भाजपने 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत 437 जागांवर उमेदवार उतरिवले होते. यातील 303 जागांवर विजय मिळाला होता. 2024 मध्ये भाजपने 'अब की बार चार सौ पार'चे लक्ष्य निर्धारित केले आहे.

162
BJP : मित्र पक्ष भाजपसाठी जागांचा त्याग करणार?
BJP : मित्र पक्ष भाजपसाठी जागांचा त्याग करणार?

वंदना बर्वे

लोकसभेच्या (Lok Sabha) आगामी निवडणुकीत रालोआतील घटक पक्षांना जागांचा त्याग करावा लागू शकतो. भाजपने (BJP) ‘अब की बार चार सौ पार’चा नारा दिला आहे. यामुळे जास्तीत जास्त जागा भाजपकडून लढविल्या जाण्याची शक्यता आहे. अशात घटक पक्षांना भाजपसाठी जागा सोडाव्या लागू शकतात.

(हेही वाचा – PM Modi Fast : पंतप्रधान मोदी राममंदिरासाठी करत असलेले व्रत काय आहे ?)

भाजप जास्तीत जास्त जागा लढविणार

भाजपने 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत 437 जागांवर उमेदवार उतरिवले होते. यातील 303 जागांवर विजय मिळाला होता. 2024 मध्ये भाजपने ‘अब की बार चार सौ पार’चे लक्ष्य निर्धारित केले आहे. याचाच अर्थ असा की, भाजप जास्तीत जास्त जागा लढविणार आहे.

भाजपने मित्र पक्षांसोबत जागा वाटपाच्या चर्चेला अद्याप सुरुवात केलेली नाही. यामुळे रालोआतील कोणता पक्ष किती जागा लढविणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या लोककल्याणकारी योजनांचा फायदा घ्यायचा असेल, तर भाजपने जास्तीत जास्त जागा लढविणे गरजेचे आहे, असे भाजपातील नेत्यांचे मत आहे.

मित्र पक्षांच्या नाराजीचा सामना नाही

सध्याच्या परिस्थितीत रालोआत जवळपास 39 पक्ष आहेत. परंतु यातील सर्वच पक्ष लोकसभेची निवडणूक (Lok Sabha election 2024) लढवणार असे नाही. महाराष्ट्र आणि बिहार ही दोन राज्ये सोडली, तर अन्य कोणत्याही राज्यात भाजपपुढे मित्र पक्षांच्या नाराजीचा सामना करावा लागेल, अशी परिस्थिती नाही.

सूत्रानुसार, भाजपला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला थोड्या जास्त जागा द्याव्या लागणार आहे. असे असले तरी, भाजपने महाराष्ट्रात 30 ते 35 जागा लढविण्याचा निश्चय केला आहे. 48 जागांच्या महाराष्ट्रात भाजपने 35 जागा लढविल्या, तर उरलेल्या 13 जागा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपसात वाटून घ्यावा लागतील.

महाराष्ट्रातील गणिते

भाजपने 2019 मध्ये महाराष्ट्रात 25 जागा लढवल्या होत्या आणि 23 जागा जिंकण्यात यश मिळवले होते. एनडीएचा भाग असलेल्या शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि 18 जागा जिंकल्या होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात भाजप आघाडीवर आहे. बिहारमधून जेडीयू बाहेर पडल्यानंतर भाजप ३० हून अधिक जागांवर नव्याने निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. 2014 मध्ये भाजपने 30 जागांवर निवडणूक लढवली होती आणि 22 जागा जिंकल्या होत्या. एलजेपीला सातपैकी सहा जागा मिळाल्या होत्या.

2019 मध्ये जेडीयूसोबतच्या करारामुळे, भाजपने आपल्या पाच जिंकलेल्या जागा सोडल्या होत्या आणि 17 जागांवर लढून सर्व जागा जिंकण्यात यश मिळवले होते. त्याचवेळी जेडीयूने 17 पैकी 16 जागा जिंकल्या होत्या. एलजेपीला सर्व सहा जागा जिंकण्यात यश आले. मात्र, आता भाजप लोजपाला चार जागा सोडणार अशी चर्चा आहे.

कर्नाटकात 26 जागा लढवणार

उपेंद्र कुशवाह यांच्या पक्ष राष्ट्रीय लोक जनता दलाला एक किंवा दोन जागा आणि जीतन राम मांझी यांच्या पक्ष एचएएमला एक जागा दिली जाऊ शकते. बिहारमध्येच 33 जागांवर निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

कर्नाटकात (Karnatak) तीन जागांची मागणी करणाऱ्या जेडीएसला भाजपने लोकसभेच्या दोन आणि राज्यसभेची एक जागा देऊ केली आहे. गेल्या वेळी भाजपने 27 जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी 25 जागा जिंकल्या होत्या. शिवाय भाजपच्या पाठिंब्यामुळे एक अपक्ष उमेदवारही विजयी झाला होता. यावेळी भाजपने 26 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये अपना दल आणि निषाद पक्षाला दोन-तीन जागा देण्याव्यतिरिक्त उर्वरित सर्व जागा भाजप स्वतः लढवणार आहे. झारखंडमध्ये एजेएसयूला एक जागा मिळणे निश्चित आहे. दक्षिण भारतात कर्नाटकपाठोपाठ भाजप तामिळनाडूवर सर्वाधिक जोर देत आहे, परंतु एआयएडीएमकेसोबत जागावाटप आणि एकत्र निवडणुका लढवण्याबाबत अद्याप चर्चा सुरू झालेली नाही. चर्चा झाली तरी भाजप तामिळनाडूमध्ये १५ पेक्षा जास्त जागांची मागणी करू शकतो.

आंध्र प्रदेशातही टीडीपीची अशीच स्थिती असेल, परंतु वायआरएस रेड्डी यांच्या सहकार्याची वृत्ती लक्षात घेता भाजप तेथे टीडीपीसोबत युती करणे टाळू शकते. मित्रपक्षांना भाजपचा संदेश स्पष्ट आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता मित्र पक्षांच्या उमेदवारांनाही विजयाची हमी देईल आणि कमी जागांवर लढूनही त्यांचा फायदा होईल. तसेच या वेळी भाजपने मित्रपक्षांना दिलेल्या जागांवर संघटनेची पूर्ण ताकद पणाला लावून तितकाच प्रचार करण्याचा निर्धार केला आहे. (BJP)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.