Transgender : तृतीयपंथीही आत्मनिर्भर… पंतप्रधानांसमोर व्यक्त केली भावना

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध योजनांच्या लाभार्थी ठरलेल्या तृतीयपंथी कल्पनाबाई या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना म्हणाल्या, आम्ही सगळे तृतीयपंथीय एकत्र राहतो. यापूर्वी आम्ही लग्नसमारंभात नाचगाणे करून पोट भरत होतो. अनेक ठिकाणी आम्हाला वाईट वागणूक मिळत असे. मात्र जेव्हापासून महानगरपालिकेने साई किन्नर बचत गट सुरू करून दिला. त्यासाठी आर्थिक मदत केली, तेव्हापासून आम्ही समाजात सन्मानाने वावरत आहोत.

587
Transgender : तृतीयपंथीही आत्मनिर्भर… पंतप्रधानांसमोर व्यक्त केली भावना
Transgender : तृतीयपंथीही आत्मनिर्भर… पंतप्रधानांसमोर व्यक्त केली भावना

‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने प्रधानमंत्री मोदी (PM Narendra Modi) यांनी १८ जानेवारी २०२४ महाराष्ट्र, तेलंगाणा, राजस्थान, मेघालय आणि हरियाणा या पाच राज्यातील लाभार्थ्यांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध योजनांच्या लाभार्थी ठरलेल्या तृतीयपंथी कल्पनाबाई या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी संवाद साधताना म्हणाल्या, आम्ही सगळे तृतीयपंथीय एकत्र राहतो. यापूर्वी आम्ही लग्नसमारंभात नाचगाणे करून पोट भरत होतो. अनेक ठिकाणी आम्हाला वाईट वागणूक मिळत असे. मात्र जेव्हापासून महानगरपालिकेने साई किन्नर बचत गट सुरू करून दिला. त्यासाठी आर्थिक मदत केली, तेव्हापासून आम्ही समाजात सन्मानाने वावरत आहोत. (Transgender)

‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने प्रधानमंत्री मोदी (PM Narendra Modi) यांनी १८ जानेवारी २०२४ महाराष्ट्र, तेलंगाणा, राजस्थान, मेघालय आणि हरियाणा या पाच राज्यातील लाभार्थ्यांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. या लाभार्थ्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) माध्यमातून विविध योजनांच्या लाभार्थी ठरलेल्या तृतीयपंथीयांचा समावेश होता. मुलुंड येथे आयोजित या कार्यक्रमात खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त (परिमंडळ ६) देविदास क्षीरसागर, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, सहायक आयुक्त (टी विभाग) अजय पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते. (Transgender)

(हेही वाचा – Rajan Salvi ACB Enquiry : उबाठा गटाचे आमदार राजन साळवी यांची ६ तास चौकशी)

मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’विभागातील मुलुंड (पश्चिम) मध्ये तथास्थू हॉल, महाकवी कालिदास नाट्य मंदिर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात आली. ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे १५ नोव्हेंबर २०२३ पासून संपूर्ण देशभरात आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा २६ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार होती. मात्र देशभरातील नागरिकांना यात्रेतून विविध योजनांचा लाभ मिळत आहे. अनेक गावांमध्ये यात्रेचे स्वागत होत आहे. त्यामुळे ही यात्रा फेब्रुवारी महिन्यातही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रधानमंत्री मोदी (PM Narendra Modi) यांनी यावेळी सूचित केले. (Transgender)

महानगरपालिकेमुळे मिळाली नवी ओळख : तृतीयपंथी कल्पनाबाई

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध योजनांच्या लाभार्थी ठरलेल्या कल्पनाबाई या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी संवाद साधताना म्हणाल्या, आम्ही सगळे तृतीयपंथीय एकत्र राहतो. यापूर्वी आम्ही लग्नसमारंभात नाचगाणे करून पोट भरत होतो. अनेक ठिकाणी आम्हाला वाईट वागणूक मिळत असे. मात्र जेव्हापासून महानगरपालिकेने साई किन्नर बचत गट सुरू करून दिला. त्यासाठी आर्थिक मदत केली, तेव्हापासून आम्ही समाजात सन्मानाने वावरत आहोत. (Transgender)

बचत गटासाठी बँक ऑफ महाराष्ट्रमधून आम्हाला सुरुवातीला एक लाख रुपयांचे कर्ज मिळाले. ते फेडल्यानंतर आम्हाला पाच लाख रुपयांचे कर्ज मिळाले आहे. तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचाही (Pradhan Mantri Swanidhi Yojana) आम्हाला लाभ मिळाला आहे. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही विविध प्रकारच्या बास्केट तयार केल्या. त्या विकून उदरनिर्वाह सुरू आहे. याशिवाय आम्ही मुलुंड परिसरात इडली-डोसा विकतो, फुलं विकतो. अशा प्रकारे आम्ही सगळे तृतीयपंथीय आज स्वत:च्या पायावर उभे आहोत. महानगरपालिकेने आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केल्याने आम्ही सन्मानाने जगायला शिकलो, असेही कल्पनाबाई म्हणाल्या. (Transgender)

(हेही वाचा – Deep cleaning Drive : मुंबईतील मंदिरांची २२ जानेवारीपर्यंत सखोल स्वच्छता)

तृतीयपंथीयांचा प्रवास प्रेरणादायी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

कल्पनाबाईंशी संवाद साधतांना प्रधानमंत्री मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, कल्पनाबाई तुम्ही सहकाऱ्यांना सोबत घेवून बचत गट सुरू केला. सगळे स्वत:च्या पायावर उभे आहात. तृतीयपंथीयांची समाजातील प्रतिमा तुमच्यामुळे बदलली आहे. तुमचे आयुष्य संघर्षपूर्ण असतांनाही तुम्ही हार न मानता समाजात नवी ओळख निर्माण केली. तुमचे कार्य अनेकांना प्रेरणादायी आहे, असे प्रधानमंत्री म्हणताच सभागृहातील उपस्थित तृतीयपंथीयांनी टाळ्यांचा गजर करून प्रधानमंत्र्यांना धन्यवाद दिले. (Transgender)

कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणी, उज्ज्वला योजना, विविध क्रीडा योजना, आधारकार्डशी संबंधीत कामकाज आदींचे दालन उभारण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचेही वाटप करण्यात आले. (Transgender)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.