BMC : शहराच्या पालकमंत्र्यांकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धरले जाते वेठीस

शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडून दर बुधवारी महापालिका अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली जात आहे. या बैठकीत केसरकर यांच्याकडून तब्बल ६२ विकास कामांचा तसेच संकल्पनांचा आढावा घेतला जात आहे. मात्र, या बैठकीला केसरकर वेळेवर उपस्थित राहत नसून बैठकीसाठी अनेक तासांची प्रतीक्षा केल्यानंतर बैठकच रद्द करण्याचा प्रकार वारंवार घडू लागला आहे.

2043
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त

शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडून दर बुधवारी महापालिका अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली जात आहे. या बैठकीत केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडून तब्बल ६२ विकास कामांचा तसेच संकल्पनांचा आढावा घेतला जात आहे. मात्र, या बैठकीला केसरकर वेळेवर उपस्थित राहत नसून बैठकीसाठी अनेक तासांची प्रतीक्षा केल्यानंतर बैठकच रद्द करण्याचा प्रकार वारंवार घडू लागला आहे. त्यामुळे केसरकर यांच्या या अशाप्रकारच्या वर्तनामुळे महापालिकेचा अधिकारी वर्ग त्रस्त झाला असून बैठकीच्या नावावर तासनतास प्रतीक्षा करायला लावूनही बैठका रद्द केल्या जात असल्याने एकप्रकारे केसरकर यांच्याकडून महापालिकेच्या कर्मचारीवृंदाला वेठीस धरले जात असल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. (BMC)

मुंबई महापालिका मुख्यालयात मुंबई शहरातील विविध विकासकामांसाठी शालेय शिक्षणमंत्री व मराठी भाषा तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे विषयाबाबत बैठक घेतात. तसेच विविध कामांसंदर्भातील सादरीकरणही विभाग तथा खात्यांमार्फत केले जाते. दर बुधवारी पालकमंत्र्यांकडून महापालिका मुख्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले जाते आणि मागील आठवड्यात मांडलेल्या विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. विशेष म्हणजे प्रत्येक बैठकीत कोणत्याही कामांची प्रगती दिसून येत नाही तरीही पालकमंत्र्यांकडून आढावा बैठक घेत आपण काही करतोय हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. (BMC)

पालकमंत्र्यांकडून सुचवलेले गेलेले प्रकल्प, विकासकामे तसेच संकल्पना या दिर्घ स्वरुपाच्या असून त्या कमी वेळांमध्ये पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे यासर्व कामांचा दर महिन्यांनी बैठक घेऊन आढावा घेणे योग्य असले तरी केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडून तसा प्रयत्न होत नाही. किंबहुना प्रत्येक विभाग आणि खात्यांचा स्वतंत्रपणे दर बुधवारी आढावा घेतल्यास प्रत्येक विभागांना आपली वेळ पुन्हा पाचव्या किंवा सहाव्या आठवड्यात येईल तेव्हा कामाची प्रगती दाखवण्याची संधी मिळू शकते. परंतु तसेही नियोजन केले जात नाही. केसरकर हे स्वत:च्या मनाप्रमाणेच वागत असल्याने नियोजनाअभावी बऱ्याचदा त्यांना विविध बैठकांची वेळ साधण्याच्या प्रयत्नात महापालिकेतील नियोजित बैठक वेळेवर होऊ शकत नाही. परिणामी या बेठकीसाठी नियोजित वेळेपूर्वी आलेल्या अधिकाऱ्यांना तासनतास त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागते. (BMC)

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : ‘२२ जानेवारी’ दिवस ‘मर्यादा पुरुषोत्तम दिन’ घोषित करा; हिंदू महासभेची मागणी)

अधिकाऱ्यांचा वेळ गेला वाया 

केसरकर (Deepak Kesarkar) यांनी २९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी चार वाजता आढावा बैठक बोलावली होती, परंतु अंगणवाडी सेविकांचा मोर्चा असल्याने ते वेळेवर बैठकीला आले नाहीत, परंतु ते उशिराने येतील असा संदेश पाठवला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख, विभागप्रमुख तसेच संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने बसून रहिली आणि उशिराने त्यांना ही बैठक रद्द झाल्याचा संदेश आला. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचा तीन ते चार तासांचा अवधी वाया गेला होता. (BMC)

तसाच प्रकार बुधवारी १७ जानेवारी रोजी घडला. केसरकर यांची दुपारी दोन वाजताचा बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतु पुढे ही बैठक चारची करण्यात आली आणि त्यानंतर या बैठकीची वेळ वाढवली. परंतु दुपारी दीडपासून या बैठकीसाठी उपस्थित राहायला आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बैठक रद्द झाल्याचा संदेश येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे केसरकर यांचा बैठका आवरा म्हणण्याची वेळ महापालिकेच्या कर्मचारीवृदांवर आली आहे. केसरकर यांच्यामुळे अधिकारी तासनतास त्यांच्या प्रतीक्षेत अडकून पडत असल्याने सामान्य नागरिकांना त्या अधिकाऱ्यांच्या भेटी होत नाही. शिवाय बैठक होणार असल्याने संबंधित आपल्या दालनातील कोणत्याही कामांचेही नियोजन करत नाही. परिणामी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कामेच या बैठकांमध्ये होत नाही. त्यामुळे केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्येक विभाग तथा खात्याशी संबंधित विकासकामांची यादी तयार करून एकेका दिवशी याचा आढावा घेतल्या इतर अधिकारीही अडकले जाणार नाही तसेच केसरकर (Deepak Kesarkar) यांना कामाची प्रगतीही जाणून घेता येईल, असे बोलले जात आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.