मुंबईमध्ये ‘या’ देशातून येणाऱ्यांना दिलासा! क्वारंटाईन, RTPCR टेस्टचं ‘नो टेन्शन’…

136

मुंबईत सध्या रुग्णसंख्येत घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे कदाचीत तिसरी लाट येऊन गेल्याचे राज्य सरकारच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईमध्ये आता संयुक्त अरब अमिरात आणि दुबईवरुन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सात दिवसाच्या होम क्वारंटाईन आणि कोरोना आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य नसणार आहे. मुंबई महापालिकेनं नव्या ट्रॅव्हल गाइडलाइंस 17 जानेवारीपासून लागू केल्या आहेत. या संदर्भातील रविवारी ट्वीट करत बीएमसीनं माहिती दिली आहे.

dolon

काय म्हटले बीएमसीने…

मुंबईमध्ये संयुक्त अरब अमिरातसह दुबईहून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता सक्तीने 7 दिवस होम क्वारंटाइन आणि आल्यानंतर RTPCR चाचणीत सूट देण्यात आली आहे. 29 डिसेंबर रोजी दुबईसह यूएईमधून आलेल्या प्रवाशांना मुंबईत आल्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाइन आणि आल्यानंतर RTPCR चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. मात्र आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मुंबईत आल्यानंतर होम क्वारंटाइन आणि कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे बीएमसीने म्हटले आहे.

(हेही वाचा – सर्वाधिक बछड्यांना जन्म देणाऱ्या प्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीचा मृत्यू)

मुंबईत सलग चौथ्या दिवशी रुग्णांमध्ये घट

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये घट होताना दिसतेय. मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. बुधुवारी मुंबईत 16 हजार 420, गुरुवारी 13 हजार 702 , शुक्रवारी 11 हजार 317, शनिवारी 10,661 तर रविवारी मुंबईत 7 हजार 895 नवे कोरोना बाधित आढळले होते. त्यामुळे त्यामध्ये सातत्याने घट दिसून आली. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला असल्याचे मत राज्य सरकारच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.