मुंबई महापालिकेचे ‘ते’ सहआयुक्त पुन्हा येणार

90

मुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवार यांची राज्यातील ठाकरे सरकारने नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली होती. परंतु राज्यातील ठाकरे सरकार जावून शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर यापूर्वीच्या सरकारने घेतलेले निर्णय फिरवण्याचा सुरुवात केली असून त्याचा भाग म्हणून सनदी अधिकाऱ्यांची वर्णी लागणाऱ्या या पदावर महापालिकेच्या सहआयुक्तांची प्रतिनियुक्ती केल्याने त्यांना पुन्हा महापालिकेत पाठवण्याचा विचार केला जावू शकतो, अशाप्रकारच्या चर्चांना वेग आला आहे.

( हेही वाचा : अखेर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप)

रमेश पवार यांनी महापालिका आयुक्त कार्यलयात उपायुक्त म्हणून या पदावर अनेक वर्ष सेवा बजावली आहे. सध्या ते सह आयुक्त(सुधार) या पदावर कार्यरत आहेत. पण २२ मार्च २०२२ रोजी नाशिक महापालिका आयुक्तपदी रमेश पवार यांच्या नियुक्तीचे आदेश नगर विकास विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आले होते. रमेश पवार यांची प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले होते.

रमेश पवार यांनी आयुक्त सहाय्यक आयुक्त या पदावर विविध प्रशासकीय विभागांमध्ये सेवा बजावली आहे. त्यानंतर उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाल्यावर त्यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्यासमवेत आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त पदाचा पदभार समर्थपणे पेलला होता. त्यानंतर कोविड काळामध्ये आरोग्य विभागाची प्रारंभीची महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती.

मात्र, त्यांची नियुक्ती ही ठाकरे सरकार असेपर्यंत आहे,असे म्हटले जात होते. त्यामुळे राज्यात शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांचा गट स्वतंत्र झाल्यानंतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनल्यानंतर पवार यांना बदलीची हवा जोरात सुरु आहे. खुद्द आयएसएस वर्गातून पवार यांच्या नियुक्तीला विरोध असल्याने सर्वप्रथम पवार यांना नाशिक महापालिका आयुक्तपदावरून हटवून तिथे सनदी अधिकाऱ्याची वर्णी लावण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पवार यांच्या पुन्हा महापालिकेतील परतीची हवा सध्या जोरात वाहू लागली असून पवार यांना बाजूला करून कुणाची वर्णी शिंदे व फडणवीस सरकार लावते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.