मोरबी पूल दुर्घटनेत 141 जणांचा मृत्यू; अनेक जण अजूनही बेपत्ता

115

MorbiBridgeCollapse गुजरातमधील मोरबीत रविवारी झुलता पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोकांचे आतापर्यंत बचावकार्य सुरु आहे. विशेष म्हणजे हा पूल चार दिवसांपूर्वीच दुरुस्त केला होता आणि त्यानंतर आता सलगच्या सुट्ट्यांमुळे गर्दी झाली आणि पूल कोसळला. गुजरातमध्ये दुर्घटनेपूर्वी पुलावर तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती गुजरात सरकारने दिली आहे.

( हेही वाचा: हलाल प्रमाणपत्र देणारी संघटना दहशतवाद्यांना करतेय अर्थपुरवठा, चौकशीची मागणी )

170 हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश

माच्छू नदीवर बनवण्यात आलेला हा झुलता पूल पाच दिवसांपूर्वीच नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. संध्याकाळी 7 च्या सुमारास ही दुर्घटना घडली, त्यावेळी 500 हून अधिक नागरिक उपस्थित होते. सर्वजण छट पुजेसाठी आले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा सहभाग अधिक होता. या दुर्घटनेत 400 हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती आता वर्तवली जात आहे. तर आतापर्यंत 170 हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.