Kandukuri Veeresalingam : समाजसुधारक आणि लेखक कंदुकूरी वीरेशलिंगम

वीरेशलिंगम हे तेलगू, संस्कृत आणि हिंदी भाषेतील विद्वान होते. साहित्य हे समाजकंटकांच्या विरोधात लढण्याचे साधन मानून त्यांनी आपली लेखणी चालवली. (Kandukuri Veeresalingam)

67
Kandukuri Veeresalingam : समाजसुधारक आणि लेखक कंदुकूरी वीरेशलिंगम

कंदुकुरी वीरेशलिंगम (Kandukuri Veeresalingam) हे ब्रिटिश भारतातील मद्रास प्रेसिडेन्सी येथील समाजसुधारक आणि लेखक होते. ते तेलुगू पुनर्जागरण चळवळीचे जनक मानले जातात. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला आणि विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर त्यांनी बालविवाह आणि हुंडा प्रथेविरुद्धही लढा दिला. १८७४ मध्ये त्यांनी डोलईश्वरम येथे एक शाळा सुरू केली, तसेच १८८७ मध्ये ‘ब्रह्मो मंदिर’ बांधले आणि १९०८ मध्ये आंध्र प्रदेशमध्ये ‘हितकारिणी स्कूल’ बांधले. (Kandukuri Veeresalingam)

कंदुकुरी वीरेशलिंगम (Kandukuri Veeresalingam) यांचा जन्म मद्रास प्रेसिडेन्सी येथील राजमुंद्री येथे १६ एप्रिल १८८४ साली झाला. ते तेलुगू भाषिक ब्राह्मण होते. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे मामा वेंकटरत्नम यांनी दत्तक घेतले होते. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना त्यांच्या शाळेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मिळाला होता. १८६९ मध्ये त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले आणि त्यांना कोरंगी गावात शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. (Kandukuri Veeresalingam)

(हेही वाचा – IPL 2024, Dharamsala Pitch : धरमशालाची नवीन हाय-ब्रीड खेळपट्टी आयपीएल आयोजनासाठी तयार)

वीरेशलिंगम हे तेलगू, संस्कृत आणि हिंदी भाषेतील विद्वान होते. साहित्य हे समाजकंटकांच्या विरोधात लढण्याचे साधन मानून त्यांनी आपली लेखणी चालवली. त्यांनी प्रल्हाद आणि सत्य हरिश्चंद्र ही नाटके लिहिली. त्यांनी १८८० मध्ये राजशेखरा चरिता ही कादंबरी लिहिली. ही पहिली तेलुगू कादंबरी होती. ते राजा राममोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि केशब चंद्र सेन यांसारख्या ब्राह्मो समाज नेत्यांच्या तत्त्वांनी प्रेरित होते. (Kandukuri Veeresalingam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.