Israel-Iran Attack: इस्रायलने दिले इराणला प्रत्युत्तर; लष्करी तळ, अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ले

इस्रायलने इस्फहानमधील अणुऊर्जा प्रकल्पांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य केले आहे.

172
Israel-Iran Attack: इस्रायलने दिले इराणला प्रत्युत्तर; लष्करी तळ, अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्रे आणि ड्रोन हल्ले

इराण आणि इस्त्रायलमधील तणाव वाढत चालला आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्त्रायलने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इराणवर हल्ला केला आहे. इराणच्या इसाफहान शहरातील स्फोटांचे आवाज विमानतळावर ऐकू आल्याची माहिती इराणी वृत्तसंस्था फार्सने दिली आहे. (Israel-Iran Attack)

इस्रायलने शुक्रवारी, (१९ एप्रिल) इराणच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पावरही इस्रायलने क्षेपणास्त्रे डागली असल्याचे मानले जाते. इराणनेही इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे आणि अनेक प्रांतांमध्ये संरक्षणविरोधी बॅटरी क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्याला विरोध केला आहे. त्याच वेळी, इस्रायलने इस्फहानमधील अणुऊर्जा प्रकल्पांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य केले आहे, असा दावा अनेक प्रसारमाध्यमांनी केला आहे. इराणने १३ एप्रिलला मध्यरात्री इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. इराणने इस्रायलवर ३०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. जी इस्रायलने अमेरिका आणि इतर देशांच्या मदतीने हाणून पाडली.  (Israel-Iran Attack)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : आधी मतदान, मगच लग्न.. नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क )

सीएनएनच्या वृत्तानुसार, अनेक उड्डाणे इराणच्या हवाई क्षेत्रात वळविण्यात आली आहेत, मात्र या हल्ल्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गेल्या आठवड्यात इराणने सीरियातील आपल्या दूतावास परिसरामध्ये केलेल्या संशयित इस्रायल हल्ल्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे इस्त्रायली हद्दीत पोहोचण्यापूर्वीच पाडण्यात आली होती. इराणने सिरियाची राजधानी दमिश्मकमध्ये त्यांच्या राजनैतिक परिसरात १ एप्रिलला झालेल्या हल्ल्याचा संशय इस्त्रायलवर व्यक्त करण्यात आला होता. ज्यामध्ये इराणी इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डचे वरिष्ठ जनरल सहित ७ सदस्यांचा मृत्यू झाला होता.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, (Foreign Minister S. Jaishankar)
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, पश्चिमी आशियात स्थिरता गरजेची आहे. तिथे जवळपास १ कोटी हिंदुस्थानी नागरिक राहतात. आमच्या व्यावसायिक शिपिंगचा मोठा भाग याच प्रदेशातून जातो आणि तेलही तिथूनच येते. हा अतिशय संवेदनशील प्रदेश आहे. त्यामुळे जेव्हा अशा प्रकारचा तणाव आणि शत्रुत्व असते तेव्हा आम्ही खूप तणावाखाली असतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.