IPL 2024, Rohit Sharma on Impact Player : ‘क्रिकेटमध्ये ११ खेळाडू असतात, १२ नाही’

IPL 2024, Rohit Sharma on Impact Player : रोहित शर्माने आयपीएलमधील इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर सडकून टीका केली आहे 

117
IPL 2024, Rohit Sharma on Impact Player : ‘क्रिकेटमध्ये ११ खेळाडू असतात, १२ नाही’
IPL 2024, Rohit Sharma on Impact Player : ‘क्रिकेटमध्ये ११ खेळाडू असतात, १२ नाही’
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्माने (Rohit Sharma) आयपीएलमधील इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमांवर टीका केली आहे. या नियमामुळे अष्टपैलू क्रिकेटपटूंना भवितव्य उरणार नाही, अशी भीतीही त्याने व्यक्त केली आहे. ॲडम गिलख्रिस्त (Adam Gilchrist) आणि मायकेल वॉन (Michael Vaughan) यांच्या पॉडकास्ट कार्यक्रमात रोहितने हे मत मांडलं आहे. (IPL 2024, Rohit Sharma on Impact Player)

(हेही वाचा- World Liver Day : का साजरा केला जातो जागतिक यकृत दिन?)

‘इम्पॅक्ट खेळाडूची खरंच गरज आहे का? क्रिकेट हा अकरा खेळाडूंचा खेळ आहे, १२ नव्हे. शिवाय इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे हळू हळू अष्टपैलू क्रिकेटपटूंचं भवितव्यच उरणार नाही ही भीती वाटते,’ असं रोहित म्हणतो. (IPL 2024, Rohit Sharma on Impact Player)

रोहितने आपला मुद्दा पटवून देताना शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांचं उदाहरण दिलं आहे. या खेळाडूंकडे फलंदाज आणि गोलंदाज म्हणूनही कामगिरी करण्याची क्षमता आहे. पण, इम्पॅक्ट खेळाडूमुळे त्यांचं नुकसान होतं, असं रोहितचं म्हणणं आहे. ‘म्हणूनच मला इम्पॅक्ट खेळाडूचा नियम आवडत नाही. खेळ मनोरंजक बनवण्यासाठी खेळातील मूलभूत गोष्टींनाच सुरुंग लावला जात आहे,’ असं रोहीत पॉडकास्टमध्ये म्हणाला. (IPL 2024, Rohit Sharma on Impact Player)

(हेही वाचा- Mukesh Dhirubhai Ambani: ‘हे’ आहेत आशियातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती)

शिवम दुबे (Shivam Dube) हा अष्टपैलू खेळाडू आहे. पण, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्येही गोलंदाज म्हणून तो तितकीशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे टी-२० विश्वचषकात अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागण्याची शक्यता कमीच आहे. अशावेळी दुबे सारख्या गुणी क्रिकेटपटूला मिळायला हवी तशी संधी इम्पॅक्ट खेळाडू नियमामुळे मिळू शकत नाही, असं रोहितला वाटतं. (IPL 2024, Rohit Sharma on Impact Player)

२०२३ च्या आयपीएलपासून इम्पॅक्ट खेळाडूचा नियम अस्तित्वात आला आहे. यात सामन्यात कुठल्याही क्षणी नवीन खेळाडू एखाद्या खेळत असलेल्या खेळाडूला बदली खेळाडू म्हणून संघात येऊ शकतो. ४० षटकांच्या संपूर्ण सामन्यात कुठल्याही क्षणी या नियमाचा वापर करता येऊ शकतो. अगदी नाणेफेकीनंतर शेवटचा चेंडू पडेपर्यंत या नियमाचा वापर करता येऊ शकतो.  (IPL 2024, Rohit Sharma on Impact Player)

(हेही वाचा- Aryabhata Satellite : भारताचा पहिला उपग्रह ’आर्यभट्ट’ आजच्या दिवशी १९ एप्रिलला झाला होता लॉन्च!)

रोहितला इम्पॅक्ट खेळाडूचा नियम आवडला नसला तरी त्यात सुधारणा करण्यासाठी नेमकं काय करता येईल, याचा विचार रोहितनेही केलेला नाही. इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमाबद्दल आतापर्यंत बरीच उलटसुलट चर्चा झाली आहे. अनेकांनी त्यावर टीकाही केलेली आहे. पण, तरीही आयपीएलमध्ये या नियमाचा वापर सुरूच आहे. (IPL 2024, Rohit Sharma on Impact Player)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.