Aryabhata Satellite : भारताचा पहिला उपग्रह ’आर्यभट्ट’ आजच्या दिवशी १९ एप्रिलला झाला होता लॉन्च!

80
Aryabhata Satellite : भारताचा पहिला उपग्रह ’आर्यभट्ट’ आजच्या दिवशी १९ एप्रिलला झाला होता लॉन्च!
Aryabhata Satellite : भारताचा पहिला उपग्रह ’आर्यभट्ट’ आजच्या दिवशी १९ एप्रिलला झाला होता लॉन्च!

आर्यभट्ट (Aryabhata Satellite) हा इस्रोने तयार केलेला भारताचा पहिला उपग्रह आहे. या उपग्रहाचं नाव खगोलशात्रज्ञ आर्यभट्ट यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. हे सॅटेलाईट १९ एप्रिल १९७५ साली कॉसमॉस-3M हे प्रक्षेपण वाहन वापरून अस्त्रखाण ओब्लास्ट येथील विकास साईट कपस्टिन यार येथून सोव्हिएत इंटरकॉसमॉस या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सोव्हिएत युनियन रॉकेट प्रक्षेपण यांच्यातर्फे लॉन्च करण्यात आलं होतं. (Aryabhata Satellite)

(हेही वाचा- Ghatkopar : वृक्षांच्या मुळावर उठलंय कोण? ४५ वृक्षांवर विषप्रयोग)

या सॅटेलाईटचा अंतराळातील फोटो त्याकाळी भारतीय चलनातील दोन रुपयांच्या नोटेवर छापण्यात आला होता. हे सॅटेलाईट सोलर फिजिक्स, एक्सरे अस्ट्रॉनॉमी आणि एरोनॉमिक्सचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आले होते. हे सॅटेलाईट ४.६ फूट व्यासाच्या सव्वीस बाजू असलेल्या पॉलिहायड्रोनच्या आकाराचे होते. त्याच्या खालची आणि वरची बाजू वगळता प्रत्येक बाजूला सोलर सेल्सनी झाकण्यात आलं होतं. (Aryabhata Satellite)

(हेही वाचा- DRDO: चांदीपूर येथून स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी)

या सॅटेलाईटने चार दिवसांत साठ ऑर्बिट्स चकरा मारल्यानंतर आपले काम करणे थांबवले. पाचव्या दिवशी या यानाने आपले स्पेसक्राफ्टचे सगळे सिग्नल गमावले. त्यानंतर मेन स्पेसक्राफ्ट १९८१ सालापर्यंत सुरू राहिली. मग पुढे ऑरबीटल डिकॅसीमुळे १० फेब्रुवारी १९९२ साली यानाने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला. (Aryabhata Satellite

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.