Ghatkopar : वृक्षांच्या मुळावर उठलंय कोण? ४५ वृक्षांवर विषप्रयोग

'झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा' शासनाचा हा नारा काही समाजकंटकां कडून पायदळी तुडवून मुंबई शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल आणि विषप्रयोग करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे.

1617
Ghatkopar : वृक्षांच्या मुळावर उठलंय कोण? ४५ वृक्षांवर विषप्रयोग
Ghatkopar : वृक्षांच्या मुळावर उठलंय कोण? ४५ वृक्षांवर विषप्रयोग
  • मुंबई – संतोष वाघ

‘झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा’ शासनाचा हा नारा काही समाजकंटकां कडून पायदळी तुडवून मुंबई शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल आणि विषप्रयोग करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. असाच काहीसा प्रकार धक्कादायक प्रकार पूर्व उपनगरातील घाटकोपर (Ghatkopar) पूर्वेत समोर आलेला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर असलेल्या पेल्टोफोरम (Peltophorum), सुबाभूळ (subabul) आणि पिंपळ (peepal) अशा जवळपास २० झाडांवर विषप्रयोग करण्यात आला, तर पूर्व द्रुतगती महामार्ग जंक्शन पूल ते रमाबाई आंबेडकर नगर  येथील नालापर्यंत दुभाजकावर वर असलेल्या २२ फॉक्स टेल पाम प्रजातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांवर विषप्रयोग आणि कत्तली कोणी व का केल्या याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही. अनेकवेळा मुंबईत बांधकामाच्या आड येणाऱ्या वृक्षांची विकासकाकडून बेकायदेशीर कत्तल  केली जाते, याप्रकरणी अनेक बांधकाम व्यवसायिक कंत्राटदार यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे देखील झालेले आहेत. (Ghatkopar)

(हेही वाचा- WEH Andheri Bridge : पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीवर MMRDAचे दुर्लक्ष, महापालिका करणार १०० कोटींचा खर्च)

घाटकोपर (Ghatkopar) पूर्व द्रुतगती महामार्ग, रेल्वे पेट्रोल पंपासमोर, मृत अवस्थेत आढळून आले आहेत या वृक्षांवर विषप्रयोग करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असून तर पूर्व द्रुतगती महामार्ग जंक्शन पूल ते रमाबाई आंबेडकर नगर  येथील नालापर्यंत दुभाजकावर वर असलेल्या २२ फॉक्स टेल पाम प्रजातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचे मुंबई महानगर पालिकेच्या ‘एन वॉर्ड’ उद्यान विभागाचे अधिकारी कृष्णा लांबे यांच्या लक्षात आले, त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता रेल्वे पेट्रोल पंप समोर असलेले पेल्टोफोरम (Peltophorum), सुबाभूळ (subabul ) आणि पिंपळ (peepal) अशा जवळपास २० झाडांच्या बुंध्यावर ड्रिल मशीन ने छिद्रे करून त्यात विषारी रासायनिक द्रव्य ओतण्यात आले आहे, प्रत्येकी झाडांवर ५ ते ६ छिद्रे आढळून आलेले आहेत. या विषारी रासायनिक द्रव्यामुळे झाडांची पाने गळून पडले व सर्व झाडांच्या फांद्या पूर्णपणे सुकल्यामुळे झाडे मृत झाली आहे.तर पूर्व द्रुतगती महामार्ग जंक्शन पूल ते रमाबाई आंबेडकर नगर  येथील नालापर्यंत दुभाजकावर लावण्यात आलेली फॉक्स टेल पाम प्रजातीच्या २२ झाडांची कटरच्या साहयाने कत्तल करण्यात आली आले. (Ghatkopar)
उद्यान विभागाचे अधिकारी लांबे यांनी ही बाब वरिष्ठ अधिकारीयांच्या लक्षात आणून दिली असता याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश वरिष्ठकडून देण्यात आले. पंतनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द महाराष्ट्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम १९७५ कलम २१ आणि ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी राजेश केवळे (Rajesh Kevale) यांनी दिली आहे. (Ghatkopar)
पूर्व द्रुतगती महामार्ग घाटकोपर (Ghatkopar) पूर्व नायडू कॉलनी या ठिकाणी काही वर्षांपूर्वी एक नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यात आलेला आहे. पेट्रोल पंपा समोरच एक उड्डाण पूल नुकताच बांधून त्याच्यावर वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. या पुलाला लागून आणि पेट्रोल पंपा समोर मोठ्या प्रमाणात रांगेत पेल्टोफोरम (Peltophorum), सुबाभूळ (subabul) आणि पिंपळाचे (peepal) जवळपास ५० ते ६० वृक्ष  होते. या वृक्षांची तशी कोणालाही अडचण नव्हती, त्या ठिकाणी कुठलेही बांधकाम सुरू नाही असे असताना या झाडाच्या मुळावर कोण उठलं असेल याचा शोध पोलीस आणि मनपा अधिकारी उद्यान विभागाकडून घेतला जात आहे. (Ghatkopar)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.