Maria Yurievna Sharapova: सिंगल टेनिसमध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवणारी पहिली रशियन महिला कोण?

    मारियाने वयाच्या अठराव्या वर्षीच २००५ साली जगातील पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू होण्याचा मान पटकावला होता.

    79
    Maria Yurievna Sharapova: सिंगल टेनिसमध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवणारी पहिली रशियन महिला कोण?

    मारिया युरिएव्हना शारापोव्हा ही एक रशियन माजी टेनिसपटू आहे. तिचा जन्म १९ एप्रिल १९८७ साली रशियन एसएफएसआर, सोव्हिएत युनियन, न्यागन येथे झाला. (Maria Yurievna Sharapova)

    २००१ ते २०२० या सालादरम्यान मारियाने जगभरात टूर करत वूमन टेनिस असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. एवढंच नाही, तर सिंगल खेळणाऱ्या महिलांमध्ये ती जगातल्या पहिल्या क्रमांकाची महिला ठरली. मारिया ही करियर ग्रँडस्लॅम मिळवणाऱ्या दहा खेळाडू महिलांपैकी एक आहे. २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या सिंगल टेनिस स्पर्धेत तिने सिल्व्हर मेडल मिळवले होते. मारिया ही तिच्या पिढीतल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक होती.

    (हेही वाचा – Central Railway: मध्य रेल्वेवर पायाभूत कामांसाठी दोन दिवसांचा रात्रकालीन विशेष ब्लॉक )

    युनायटेड स्टेट्सची कायमस्वरूपी रहिवासी
    मारियाने वयाच्या अठराव्या वर्षीच २००५ साली जगातील पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू होण्याचा मान पटकावला होता. सिंगल टेनिसमध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवणारी मारिया ही पहिली रशियन महिला होती. २००४ साली मारियाने महिला टेनिसपटू म्हणून पदार्पण केलं. त्या वर्षाच्या शेवटपर्यंत तिने चॅम्पियनशीप तर जिंकलीच, पण त्यासोबतच छत्तीस विजेतेपदेही जिंकून घेतली. याव्यतिरिक्त तिने तीन दुहेरी पदेही जिंकली आहेत. मारिया ही वूमन टेनिस असोसिएशनच्या अंतर्गत रशियातर्फे खेळत असली तरीही ती १९९४ पासून युनायटेड स्टेट्सची कायमस्वरूपी रहिवासी आहे.

    इंटरनॅशनल टेनिस फाउंडेशनकडून दोन वर्षांसाठी सस्पेंड
    २०१६ साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत मारिया मेडिकल चाचणीत अयशस्वी ठरली. तिच्या शरीरात मेल्डोनियन नावाचं औषध सापडलं. हे औषध वर्ल्ड्स अँटी ड्रग्ज एजन्सीकडून बॅन करण्यात आलं होतं. त्यासाठी मारियाला ITF म्हणजेच इंटरनॅशनल टेनिस फाउंडेशनने दोन वर्षांसाठी सस्पेंड केले होते. तिच्यावर चालवल्या जाणाऱ्या खटल्यात न्यायालयाला असं आढळून आलं की, तिने ते ड्रग्स जाणीवपूर्वक उत्तेजना वाढवण्यासाठी घेतलेले नव्हते. तिने काही कारणास्तव डॉक्टरांच्या सल्ल्याने ती औषधे घेतली होती. तेव्हा तिला सस्पेंड करण्याची शिक्षा पंधरा महिन्यांपर्यंत कमी करण्यात आली. २०१७ साली मारिया वूमन टेनिस असोसिएशनच्या टूरमध्ये परत आली.

    हेही पहा – 

    Join Our WhatsApp Community

    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.