IPL 2024, Rohit Sharma Banter : लखनौ विरुद्धच्या सामन्या दरम्यान रोहित आणि अमित मिश्रा यांच्यात वयावरून चिडवाचिडवी

IPL 2024, Rohit Sharma Banter : रोहितने जेव्हा वयावरून अमितला बुजूर्ग म्हटलं…

112
IPL 2024, Rohit Sharma Banter : लखनौ विरुद्धच्या सामन्या दरम्यान रोहित आणि अमित मिश्रा यांच्यात वयावरून चिडवाचिडवी
IPL 2024, Rohit Sharma Banter : लखनौ विरुद्धच्या सामन्या दरम्यान रोहित आणि अमित मिश्रा यांच्यात वयावरून चिडवाचिडवी
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (IPL 2024, Rohit Sharma Banter) मैदानात इतर खेळाडूंची टर उडवणं आणि त्यांच्याशी मजेदार गप्पा मारण्यात पटाईत आहे. खुद्द रोहितचा मंगळवारी वाढदिवस होता. आणि त्याने वयाची ३७ वर्ष पूर्ण केली. त्यादिवशी लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाविरुद्ध खेळताना मैदानात वयावरून त्याचा आणि अमित मिश्रा (Amit Mishra) यांचा संवादही रंगला. विशेष म्हणजे लखनौ संघाने हा व्हीडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. तिथे तो व्हायरल होतोय. (IPL 2024, Rohit Sharma Banter)

(हेही वाचा- IPL 2024 Mayank Yadav : तेज गोलंदाज मयंक यादव उर्वरित आयपीएलला मुकणार?)

मुंबई (Mumbai) विरुद्ध लखनौ (Lucknow Super Giants) सामन्यात मुंबईचा ४ गडी राखून पराभव झाला. मार्कस स्टॉईनिसने ६२ धावा करत मुंबईच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. सामन्यानंतर रोहित आणि अमित मिश्रा (Amit Mishra) यांच्यात एक संवाद रंगला. (IPL 2024, Rohit Sharma Banter)

लखनौचा फिरकीपटू अमित मिश्राने (Amit Mishra) रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्या पाहिजेत. त्यानंतर रोहित विचारतो, ‘तुझं वय काय आहे?’ (IPL 2024, Rohit Sharma Banter)

(हेही वाचा- Ajit Pawar: शरद पवारांनी कितीवेळा पक्ष बदलला, अजित दादांनी तारखांसह सांगितलं!)

मिश्रा – ‘४१’

रोहित – ‘काय तू ४० वर्षांचा आहेस? माझ्यापेक्षा ३ वर्षांनी मोठा?’

मिश्रा – ‘४१’

रोहित – ‘तुझी भारतीय संघात निवड झाली तेव्हा आम्ही लंगोटीत होतो. तू कधी खेळायला लागलास भारतासाठी? विसाव्या वर्षी?’

मिश्रा – हो. २० किंवा २१

(हेही वाचा- Mumbai Crime : रेल्वेतील फटका गॅंगने घेतला मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा बळी)

असा हा संवाद आतापर्यंत ४ लाखांहून जास्त लोकांनी ऐकला आहे. मुंबई विरुद्धचा सामना जिंकत लखनौ संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर मुंबईचा संघ तळाच्या बंगळुरूच्या वर नवव्या स्थानावर आहेत. (IPL 2024, Rohit Sharma Banter)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.