Irrfan Khan : चित्रपटसृष्टीत नैसर्गिक अभिनय प्रचलित करणारे चित्रपट अभिनेते इरफान खान

128
Irrfan Khan : चित्रपटसृष्टीत नैसर्गिक अभिनय प्रचलित करणारे चित्रपट अभिनेते इरफान खान
Irrfan Khan : चित्रपटसृष्टीत नैसर्गिक अभिनय प्रचलित करणारे चित्रपट अभिनेते इरफान खान

२९ एप्रिल २०२० मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी इरफान खान (Irrfan Khan) नावाचा एका सशक्त अभिनेत्याने आपला प्रवास थांबवला. चंद्रकांता या मालिकेतून लोकप्रिय झालेले इरफान खान हे सर्वांचेच आवडते अभिनेते होते. अतिशय शांत संयमी स्वभाव आणि अभिनयाप्रती समर्पण भाव ही त्यांची ओळख होती.

साहेबजादे इरफान अली खान असे त्यांचे पूर्ण नाव असून ७ जानेवारी १९६९ रोजी त्यांना जन्म राजस्थान येथे झाला. त्यांची राजघराण्याशी संबंधित होत्या आणि त्यांचे वडील उद्योगपती होते. मात्र इरफान यांनी आपल्या नावातून ’साहबजादे’ हा शब्द काढून टाकला, कारण त्यातून त्यांची कौटुंबिक श्रीमंती झळकत होती आणि त्यांनी आपल्या ‘Irfan’ या नावात आणखी एक R जोडला व ‘Irrfan’ असे नामकरण केले. त्यांना अतिरिक्त R चा उच्चार आवडायचा. ही आठवण त्यांच्या पत्नीने सांगून ठेवली आहे.

(हेही वाचा-IIT Campus Placement : आयआयटी मुंबईच्या एका तरुणाला १ कोटी रुपयांची नोकरी)

१९८८ मध्ये त्यांनी सलाम बॉम्बे या छोट्याशा भूमिकेतून चित्रपटात पदार्पण केले. पुढे अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. त्यांनी काही फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांच्या चित्रपटांमध्ये काम केले जसे की, संदीप चट्टोपाध्याय यांनी दिग्दर्शित केलेल्या रिकोनिसन्स. १९९४ मध्ये त्यांनी गाजलेल्या चंद्रकांता या मालिकेत बद्रिनाथची भूमिका केली. त्याचबरोबर जय हनुमान या मालिकेत त्यांनी वाल्मिकीची भूमिका निभावली. त्याचबरोबर ते चित्रपटात देखील काम करत होते. द वॉरियर या ब्रिटिश चित्रपटातून त्यांनी काम केले. हासील आणि मकबुल या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षात राहिल्या आहेत.

त्यानंतर इरफान खान (Irrfan Khan) हे नाव लोकांना लक्षात राहू लागले. पुढे त्यांनी अनेक चित्रपट केले आणि आपल्या अभिनयाची छाप पाडली. नॅचरल अभिनय हा प्रकार अस्तित्वात आणला. द लंचबॉक्स या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर लाईफ ऑफ पाय, अमेझिंग स्पायडरमॅन, जुरासिक पार्क, इनफर्नो या हॉलिवुड चित्रपटांत देखील महत्वाच्या भूमिका त्यांनी साकारल्या. हिंदी मीडियम, अंग्रेजी मीडियम हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले. एकीकडे स्टायलिश, डान्सर, रोमॅंटिक नायकांची लाट आली होती, त्यामध्ये इरफान खान यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि सर्वसामान्य दिसणारा मात्र सशक्त अभिनय क्षमता असणारा माणूस देखील नायक होऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केले.

ते आपल्या परिस्थितिशी लढले. मात्र कॅन्सरशी लढताना त्यांना अपयश आले आणि २९ एप्रिल २०२० मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आज त्यांचा जन्मदिवस. इरफान खान यांना आमचे अभिवादन… वाचकहो, तुम्हाला इरफान खान यांची कोणती भूमिका जास्त आवडली हे आम्हाला नक्की सांगा…

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.