Supriya Pathak : शाहीद कपूरची सावत्र आई आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री; तुम्ही ओळखता का तिला?

पंकज कपूर यांची पत्नी आणि शाहीद कपूरची सावत्र आई देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. या कलाकाराचं नाव आहे Supriya Pathak

605
Supriya Pathak : शाहीद कपूरची सावत्र आई आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री. तुम्ही ओळखता का तिला?
Supriya Pathak : शाहीद कपूरची सावत्र आई आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री. तुम्ही ओळखता का तिला?

अभिनेता शाहीद कपूरने बॉलिवूडमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. त्याचे वडील पंकज कपूर हे खूप मोठे आणि नावाजलेले अभिनेते आहेत. मात्र पंकज कपूर यांची पत्नी आणि शाहीद कपूरची सावत्र आई देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे ही कलाकार…

(हेही वाचा – Meenatai Thackeray Market : दादरच्या मिनाताई ठाकरे फुल मार्केटचा होणार पुनर्विकास)

खिचडी या मालिकेत केली ’हंसा पारेख’ची भूमिका

या कलाकाराचं नाव आहे सुप्रिया पाठक. सुप्रिया पाठक यांना तुम्ही खिचडी या मालिकेत ’हंसा पारेख’ची भूमिका करताना पाहिलं असेल. त्यांची ही मालिका खूप गाजली आणि त्यांनी साकारलेलं पात्र अजरामर झालं. सुप्रिया पाठक यांचा जन्म ७ जानेवारी १९६१ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बलदेव पाठक. वडील राजेश खन्ना आणि दीलिप कुमार अशा नायकांचे ड्रेसमेकर होते. आईचे नाव दीना पाठक आहे, त्या अभिनेत्री आणि गुजराती थिएटर कलाकार होत्या. त्यांना एक बहीण आहे, रत्ना पाठक. रत्ना पाठक जी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री आहेत आणि नासिरुद्दीन शाह यांच्या पत्नी आहेत.

भरतनाट्यममध्ये ललित कला विषयात पदवी

दादरच्या पारशी कॉलनीत त्यांचं पालनपोषण झालं. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या नालंदा नृत्य संशोधन केंद्रातून भरतनाट्यममध्ये ललित कला विषयात पदवी प्राप्त केली. त्यांनी १९८१ मध्ये कलियुग या चित्रपटातून सहाय्यक अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी विजेता, मासूम, मिर्च-मसाला, राख अशा अनेक चित्रपटात काम केले.

(हेही वाचा – Veer Savarkar : क्रांतिकारकांचा खरा इतिहास पुढे आणण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रयत्नशील – असिलता सावरकर)

११ वर्षांनंतर पुनरागमन 

पुढे त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमधून मोठा ब्रेक घेतला. तब्बल ११ वर्षांनंतर त्यांनी सरकार या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले आहे. रामलीला – गोलियों की रास लीला या चित्रपटात देखील काम केले आहे. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. आजही त्या सक्षमपणे काम करत आहेत आणि आपल्या अभिनयाची जादू दाखवत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.