Ramesh Bais : आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना

राज्यपालांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाचा शुभारंभ

151
Ramesh Bais : आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना
Ramesh Bais : आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना

पंजाबमध्ये होत असलेल्या ‘किला रायपूर खेल महोत्सव’ अर्थात रूरल ऑलिम्पिक प्रमाणे महाराष्ट्रातील कबड्डी, खोखो, दांडपट्टा आदी पारंपरिक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेला क्रीडा महाकुंभ दरवर्षी भरवल्या जावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यंदा प्रथमच आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (२६ जानेवारी) राज्यपाल बैस (Governor Ramesh Bais) यांच्या उपस्थितीत जांबोरी मैदान, मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. (Ramesh Bais)

महाकुंभाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई व उपनगर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, क्रीडा भरतीचे गणेश देवरुखकर तसेच मोठ्या संख्येने पारंपरिक क्रीडा प्रेमी उपस्थित होते. महाराष्ट्राला पारंपरिक खेळांची मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः तलवार युद्ध, घोडेस्वारी, भालाफेक व इतर क्रीडा प्रकारांमध्ये निपुण होते. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला चालना दिली. महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले असे सांगून पारंपरिक क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र महोत्सव सुरु केल्याबद्दल राज्यपालांनी राज्य शासन, महानगरपालिका व क्रीडा भारतीचे अभिनंदन केले. (Ramesh Bais)

(हेही वाचा – ICC ODI Player of the Year : विराट कोहली आयसीसीच्या २०२३ च्या सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू पुरस्काराचा मानकरी)

‘या’ कालावधीत होणार पारंपरिक क्रीडा स्पर्धा

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करताना मातृभाषा व मातृभूमी यांसह स्वदेशी खेळांना प्रोत्साहन द्यावे लागेल असे सांगून, कुलपती या नात्याने राज्यातील विद्यापीठांना पारंपरिक खेळांना चालना देण्याची आपण सूचना करु, असे राज्यपालांनी (Governor Ramesh Bais) सांगितले. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोक मोबाईल फोनचा अति वापर करताना दिसतात. समाजात मादक पदार्थांचा विळखा वाढत आहे. अश्यावेळी युवकांना पारंपरिक तसेच आधुनिक खेळांकडे प्रयत्नपूर्वक वळवले पाहिजे असे राज्यपालांनी (Governor Ramesh Bais) सांगितले. (Ramesh Bais)

मराठमोळ्या खेळांचा समावेश असलेला पारंपरिक क्रीडा महाकुंभ आयोजित केल्याबद्दल मंत्री मंगलप्रभात लोढा व क्रीडा भरती यांचे अभिनंदन करून लगोरी, फुगडी, कबड्डी, दोरीच्या उड्या हे पारंपरिक खेळ पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पारंपरिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन केले जाईल व त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. या स्पर्धांमधील विजेत्यांना चांगली बक्षिसे दिली जातील तसेच या स्पर्धांसोबत गडकिल्ल्यांचे प्रदर्शन देखील भरवले जाईल असे त्यांनी सांगितले. सुरुवातीला लेझीमच्या गजरात राज्यपालांनी (Governor Ramesh Bais) मशाल पेटवून महाकुंभाचे उद्घाटन केले. राज्यपालांसमोर तलवारबाजी व दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महाकुंभाचे आयोजन महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगर पालिका व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. दिनांक २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत पारंपरिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत. (Ramesh Bais)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.