ICC ODI Player of the Year : विराट कोहली आयसीसीच्या २०२३ च्या सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू पुरस्काराचा मानकरी

सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू होण्याचा मान विराटने चौथ्यांदा मिळवला आहे. 

181
ICC ODI Player of the Year : विराट कोहली आयसीसीच्या २०२३ च्या सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू पुरस्काराचा मानकरी
ICC ODI Player of the Year : विराट कोहली आयसीसीच्या २०२३ च्या सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू पुरस्काराचा मानकरी
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. वर्षभरातील सातत्यपूर्ण आणि प्रभावशाली कामगिरीच्या जोरावर हा पुरस्कार त्याने चौथ्यांदा पटकावला आहे. २०२३ हे विश्वचषक स्पर्धचं वर्ष होतं. आणि ही स्पर्धा विराटने आपल्या फलंदाजीने गाजवली होती. स्पर्धेत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घालताना ७६५ धावा केल्या होत्या. (ICC ODI Player of the Year)

वर्षभरात सर्वात जास्त एकदिवसीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही विराट (Virat Kohli) दुसऱ्या स्थानावर होता. पहिल्या स्थानावर विराटचाच (Virat Kohli) भारतीय संघातील साथीदार शुभमन गिल आहे. (ICC ODI Player of the Year)

वर्षभरात विराटने (Virat Kohli) १,३७७ धावा केल्या. आणि यात ६ शतकं तर ८ अर्धशतकं आहेत. २०२३ हे वर्षं त्याच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत मैलाचा दगड ठरलं आहे. यावर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान विराटने (Virat Kohli) एकदिवसीय क्रिकेटमधील ५१ वं शतक ठोकलं. सचिनचा ५० एकदिवसीय शतकांचा विक्रम त्याने मोडला. (ICC ODI Player of the Year)

(हेही वाचा – Ind vs Eng 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या २ कसोटींसाठी भारतीय संघात विराट ऐवजी रजत पाटिदार)

यांच्याशी होती विराटची स्पर्धा

विराट कोहलीने (Virat Kohli) पटकावलेला हा सातवा आयसीसी पुरस्कार आहे. तर एकदिवसीय क्रिकेटसाठी मिळालेला त्याचा चौथा पुरस्कार आहे. यापूर्वी २०१२, २०१७ आणि २०१८ मध्ये तो या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. २०१७ आणि २०१८ मध्ये तो सर गारफिल्ड सोबर्स वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराचा मानकरी ठरला होता. यंदा या पुरस्कारासाठी विराटची स्पर्धा होती ती संघातील सहकारी शुभमन गिल, मोहम्मद शामी आणि न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज डेरिल मिचेल यांच्याशी. (ICC ODI Player of the Year)

यंदाच्या वर्षी विराटला (Virat Kohli) वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठीही नामांकन होतं. पण, तो पुरस्कार ऑस्ट्रेलियन संघाला एकदिवसीय विश्वचषक आणि टेस्टमध्येही विजय मिळवून देणाऱ्या पॅट कमिन्सला गेला. (ICC ODI Player of the Year)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.