केतकीची ‘ती’ पोस्ट 2020 मध्येच झाली होती व्हायरल? तपासात माहिती समोर

100

अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबूकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. या पोस्टनंतर तिला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिने केलेल्या या पोस्टचा आता पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या तपासातून एक मोठी माहिती समोर येत असल्याचे एका वृत्तवाहिनीने दिलेल्या हवाल्यावरुन समजत आहे.

2 वर्षांपूर्वी झाली होती व्हायरल

केतकी चितळे हिने पवारांविरोधात केलेली वादग्रस्त पोस्ट ही 18 जानेवारी 2020 मध्येच व्हायरल झाल्याचे तपासात समोर आल्याचे म्हटले जात आहे. ही पोस्ट त्यावेळी केतकीने व्हायरल केली नव्हती. त्यावेळी फेसबूक आणि व्हॉट्सअपवरील काही ग्रुपमध्ये व्हायरल झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

(हेही वाचाः आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीने न्यायालयालाच केला सवाल, म्हणाली…)

यामागे आहे कोण?

पवारांवर हिणकस शब्दांत टीका करणा-या या कवितेची पोस्ट केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केली आणि एकच हाहाकार उडाला. केतकीचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला. पण ही कविता 2 वर्षांपूर्वीच फेसबूक आणि काही व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत होती. त्यावेळी ती फारशी व्हायरल झाली नाही. पण आता केतकीने ती पोस्ट पुन्हा एकदा शेअर केल्यामुळे त्यावरुन वाद उसळला. त्यामुळे या सगळ्याच्या मागे नेमकं कोण आहे का, कोणाच्या सांगण्यावरुन तर केतकीने ही पोस्ट शेअर केली नाही ना, याचा शोध पोलिस घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.