ED Raid : कुख्यात लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला धक्का; १३ ठिकाणी ईडीकडून छापे

मनी लाँड्रिंगचा तपास सुरू

149
ED Raid : कुख्यात लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला धक्का; १३ ठिकाणी ईडीकडून छापे

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED Raid) लॉरेन्स बिश्नोई 9Lawrence Bishnoi) टोळीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग तपास सुरू केला आहे. ही टोळी देशात आणि परदेशात अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी, खलिस्तान समर्थक घटकांना मदत करणे, खंडणी आणि हत्यांमध्ये सक्रिय आहे. हरियाणा आणि राजस्थानमधील १३ ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे.

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू करण्यासाठी ईडीने (ED Raid) राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि हरियाणा पोलिसांकडून या टोळीविरुद्धचे खटले ताब्यात घेतले.

एनआयएने हे सिद्ध केले आहे की बिश्नोईने (ED Raid) त्याचा सहकारी सतविंदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार याच्या माध्यमातून कॅनडामधून कार्यरत असलेल्या खलिस्तानी गटांशी, विशेषतः बब्बर खालसा इंटरनॅशनलचा नेता लखबीर सिंग लांडा याच्याशी जवळून काम केले.

(हेही वाचा – Khalistani Terrorist : खलिस्तानी दहशतवादी लखबीर रोडेचा पाकिस्तानात मृत्यू)

खंडणी, बेकायदेशीर दारू, शस्त्रास्त्र तस्करी व्यवसाय इत्यादींद्वारे गोळा केलेला पैसा, गोल्डी ब्रार आणि कॅनडातील सतबीर सिंग उर्फ सॅम यांना पुढील गुंतवणूकीसाठी तसेच खलिस्तान समर्थक घटकांच्या कट्टरतावादी कारवायांना निधी पुरवण्यासाठी हवालाद्वारे पाठवण्यात आला होता असे मार्चमध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. (ED Raid)

हा तपास कशासाठी ?

लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीचे सदस्य धमक्या, खंडणी आणि भारतातील अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीतून मिळालेला निधी कॅनडा आणि इतर देशांमध्ये पाठवत होते का याचा तपास ईडी करत आहे. या निधीचा वापर खलिस्तानी समर्थकांनी केल्याचा आरोप आहे. (ED Raid)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.