राज्यातील २३ महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत पुन्हा काढणार?

103

राज्य शासनाने मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केल्यामुळे शुक्रवारी ५ ऑगस्टला ९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काढण्यात येणारी आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम आरक्षणाची अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

आरक्षण सोडत आता स्थगित

औरंगाबाद, नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल आणि मीरा-भाईंदर या ९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात येणार होती. ती आता स्थगित करण्यात आली आहे.

(हेही वाचा – National Herald मध्ये हवाला व्यवहार? सोनिया-राहुल यांची ED कडून फेरतपासणी)

त्याशिवाय मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या १४ महानगरपालिकांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचनादेखील प्रसिद्ध केली जाणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.