Dhule-Dadar Express : धुळे-दादर एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्री दानवे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे मान्यवरांचे, माध्यमांचे आणि प्रवाशांचे स्वागत केले.

166
Dhule-Dadar Express
Dhule-Dadar Express : धुळे-दादर एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्री दानवे यांनी दाखवला हिरवा झेंडा

रावसाहेब पाटील दानवे, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, भारत सरकार यांनी शनिवार २९ एप्रिल रोजी धुळे रेल्वे स्थानकावरून धुळे – दादर विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या (Dhule-Dadar Express) उद्घाटन सेवेला व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला आहे. भारती पवार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार; डॉ.सुभाष भामरे, खासदार, धुळे; उन्मेष पाटील, खासदार, जळगाव; प्रतिभा चौधरी, महापौर, धुळे; मंगेश चव्हाण, आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे मान्यवरांचे, माध्यमांचे आणि प्रवाशांचे स्वागत केले. आलोक सिंग, अतिरिक्त महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई मुख्यालयातून व्हिडिओ लिंकद्वारे सहभागी झाले होते. भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एसएस केडिया; मुख्यालय व विभागातील वरिष्ठ अधिकारी धुळे स्थानकातून कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.(Dhule-Dadar Express)

(हेही वाचा – Metro : नवी मुंबईत सिडको उभारणार नवा मेट्रो प्रकल्प)

धुळे – दादर – धुळे विशेष एक्सप्रेस (Dhule-Dadar Express) (त्रि-साप्ताहिक) रविवार ३० एप्रिल पासून सुरू होणार आहे.

धुळे – दादर – धुळे विशेष एक्सप्रेसचे फायदे :

• धुळे (Dhule-Dadar Express) हे शुद्ध ‘दूध आणि तूप’ उत्पादन, जास्तीत जास्त लागवडीयोग्य जमीन आणि भुईमुगाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कृषी आधारित उद्योगांमध्ये आघाडीवर आहे. पवन ऊर्जा निर्मितीमध्ये धुळे अग्रेसर आहे. ही ट्रेन धुळ्याला भारताच्या आर्थिक राजधानीशी जोडेल.

• ही ट्रेन आर्थिक, परवडणारी आणि जलद वाहतूक मार्ग प्रदान करेल ज्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होईल.

• शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना या ट्रेनचा खूप फायदा होईल.

हेही पहा –

01066/01065 धुळे – दादर – धुळे विशेष एक्स्प्रेसच्या नियमित सेवेच्या तपशीलवार वेळा:

01065 दि. ३०.४.२०२३ पासून दादर येथून दर रविवार, सोमवार आणि शुक्रवारी १६.१५ (४.१५) वाजता सुटेल आणि धुळ्याला त्याच दिवशी २३.३५ (११.३५) वाजता पोहोचेल. (Dhule-Dadar Express)

01066 दि. १.५.२०२३ पासून धुळे येथून दर सोमवार, मंगळवार आणि शनिवारी सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १३.१५ (१.१५) वाजता दादर येथे पोहोचेल.

संरचना : एक वातानुकूलित चेअर कार, ८ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

थांबे : शिरूड, जामधा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.