- जयेश मेस्त्री
दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांचा ‘धुरंधर २’ (Dhurandhar The Revenge) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीसह राजकीय व सामाजिक वर्तुळातही खळबळ उडाली.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. जवळजवळ ९० टक्के जनतेला हा चित्रपट अत्यंत आवडत आहे.
या चित्रपटामुळे एकीकडे देशभक्तीचा ज्वर चढला आहे, तर दुसरीकडे ‘स्वयंघोषित पुरोगामी’ चित्रपटावर टीकेची झोड उठवत आहेत. मुळात चित्रपट कोणता आवडावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र ‘धुरंधर १’ आणि ‘धुरंधर २’ या दोन्ही भागांमध्ये पाकिस्तानचा (Pakistan) खरा चेहरा जगासमोर उघडा पडला आहे, ते पाहून पुरोगाम्यांच्या पोटात गोळा का येतोय?
(हेही वाचा – India आता लहान देशांना युद्धनौका विकणार; ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राने असणार सज्ज)
‘धुरंधर’चे दोन्ही भाग प्रामुख्याने पाकिस्तानातील दहशतवादावर आधारित आहेत. या चित्रपटांमध्ये पाकिस्तानची भूमी कशा प्रकारे भारतविरोधी कारवायांचे केंद्र बनली आहे, याचे वास्तववादी चित्रण करण्यात आले आहे. विशेषतः ‘धुरंधर २’ मध्ये रणवीर सिंहने (Ranveer Singh) साकारलेले ‘हमजा’ हे पात्र थेट शत्रूच्या घरात शिरून दहशतवादाचे कंबरडे मोडताना दिसते. चित्रपटात मांडलेली ‘पीक डिटेलिंग’ म्हणजे चित्रपटाचा कळस आहे. उदाहरणार्थ नोटबंदीनंतर खनानी खरोखरच बिल्डींगवरून पडून मेला होता. अस्लम चौधरी हा सुसाइड बॉम्बस्फोटात मेला होता. भारताचे पाकिस्तानविषयक धोरण साधारण २०१५-१६ नंतर बदलले. भारत आता पाककडे पुरावे मागत नाही, अमेरिकेला मध्यस्थी करायला सांगत नाही. भारत-पाक हा आपला प्रश्न आहे आणि आपण तो आपल्या पद्धतीने सोडवतो. हा बदल चित्रपटातही दाखवण्यात आला आहे.
या वादाचा सर्वांत महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे दाऊद इब्राहिमचे (Dawood Ibrahim) चित्रण. आजवर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी दाऊदला एक ‘स्टायलिश’, ‘शक्तिशाली’ आणि ‘ग्लॅमरस’ माफिया डॉन म्हणून रंगवले होते. मात्र आदित्य धर यांनी ‘धुरंधर २’ मध्ये दाऊदची ही प्रतिमा पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. स्पॉयलर नको म्हणून त्याचे तपशील इथे वगळतोय. दाऊद हा मूळचा मराठी मुसलमान असला, तरी त्याने १९९३ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट करत आपल्याच देशाशी गद्दारी केली. त्याची पितृभूमी भारत असली, तरी त्याची पुण्यभूमी पाकिस्तान आहे, हे त्याने स्वतःच्या कृत्यांतून सिद्ध केले आहे. अशा या देशद्रोही दाऊदला जेव्हा चित्रपटात हतबल दाखवले जाते, तेव्हा पुरोगामी वर्गाला त्याचे दुःख का व्हावे? दाऊदच्या चारित्र्यासाठी किंवा त्याच्या अशा ‘मानहानीकारक’ चित्रणासाठी गळे काढणारे हे लोक नक्की कोणाचे हित पाहत आहेत, हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.
काही ‘स्वयंघोषित पुरोगामी’ आणि चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला ‘प्रोपोगंडा’ असे लेबल लावले आहे. त्यांच्या मते, हा चित्रपट केवळ एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला खतपाणी घालण्यासाठी बनवण्यात आला आहे. या टीकेला उत्तर देताना आदित्य धर यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, “ज्यांनी आपल्यासाठी राममंदिर बांधलं त्यांना कोणत्याही प्रपोगंडा चित्रपटाची आवश्यकता नाही.”
वाचकहो, भारतात आजही असा एक वर्ग आहे जो उघडपणे किंवा छुप्या पद्धतीने दाऊद आणि त्याच्यासारख्या देशद्रोही प्रवृत्तींचे समर्थन करतो. कधी मानवी हक्कांच्या नावाखाली, तर कधी कलेच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली या गुन्हेगारांची बाजू सावरली जाते. दाऊदने यापूर्वी अनेक कलाकारांना आपल्या तालावर नाचवले आहे, हे सर्वश्रुत आहे. मात्र, आता जेव्हा एखादा दिग्दर्शक या ‘अंडरवर्ल्ड-कलाकार’ नेक्ससला छेद देऊन सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा दाऊदचे समर्थक अस्वस्थ होतात. हे समर्थक भारतीय आहेत आणि जन्माने हिंदूही (स्वयंघोषित नास्तिक, पुरोगामी, सेक्युलर, शहरी नक्षली वगैरे वगैरे) आहेत. तर पाकिस्तानचा चेहरा उघडा पाडल्याने या पुरोगाम्यांना का त्रास होत असावा? दाऊदचे खरे रूप दाखवल्याने या पुरोगाम्यांना अश्रू अनावर का होत आहे? दाऊद (Dawood Ibrahim) आणि पाकिस्तानी यांचे तीर्थरूप आहेत काय?
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

