इलेक्ट्रिक बस निविदा नव्याने काढण्याच्या ‘बेस्ट’ला सूचना; मात्र टाटा मोटर्स अपात्रचं!

139

इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत टाटा मोटर्सला अपात्र ठरवण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णय उच्च न्यायालयाने मंगळवारी योग्य ठरवला आहे. न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने टाटा मोटर्सच्या अपात्रतेला आव्हान देणारी याचिका फेटाळली असून, टाटा मोटर्सला अपात्र ठरवण्याचा बेस्टचा निर्णय योग्य असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

( हेही वाचा : IRCTC ने केला नियमांमध्ये बदल! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केल्यावरच होईल तुमचे रेल्वे तिकीट बुक)

नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याची सूचना

१४०० इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अपात्र ठरविण्याच्या बेस्टच्या निर्णयाला टाटा मोटर्सने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. टाटा मोटर्सला अपात्र ठरवण्याचा बेस्टचा निर्णय योग्य असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले मात्र, त्याचवेळी या निविदा प्रक्रियेत एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीची निविदा योग्य ठरवण्याचा बेस्टाचा निर्णयही चुकीचा आहे असा निर्णय देत पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याची सूचना न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने केली.

म्हणून कंपनीला निविदा प्रक्रियेतून वगळले 

टाटा मोटर्सला अपात्र ठरवण्याचा बेस्टता निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता परंतु एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीची निविदा तांत्रिकदृष्ट्या सकारात्मक व निकषपूर्ती करणारी असल्याचा बेस्टचा निर्णयही चुकीचा आहे असे खंडपीठाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. डिझेलवरील बसगाड्या रोज दोनशे किलोमीटर धावतात तोच मुख्य निकष आम्ही बसगाड्यांच्या खरेदीसाठीही लावला. त्या निकषाची पूर्तता टाटा मोटर्सकडून होत नसल्यानेच त्या आम्ही कंपनीला निविदा प्रक्रियेतून वगळले असा युक्तिवाद बेस्टतर्फे व्यंकटेश धोंड यांनी मांडला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.