Barsu Refinery Project : बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी होणार समितीची स्थापना

आगामी वर्षात सौदी अरेबिया भारतात ८:२० लाख कोटींची गुंतवणूक करणार

138
Barsu Refinery Project : बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी होणार समितीची स्थापना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात सोमवार ११ सप्टेंबर रोजी (Barsu Refinery Project) बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पावर चर्चा झाली. या चर्चेनुसार आता ४ लाख कोटींच्या बारसू प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाली असल्याचे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.

बारसू हा प्रकल्प (Barsu Refinery Project) सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे.

पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार (Barsu Refinery Project) यांच्या या बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आगामी वर्षात सौदी अरेबिया भारतात ८:२० लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राजकुमार सलमान यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले.

(हेही वाचा – Manoj Jarange Patil : अखेर जरांगे पाटलांनी घेतलं सलाईन; लवकरच घेणार पुढचा निर्णय)

बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे राज्यातील राजकारण पेटले होते

काही महिन्यांपूर्वी बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे (Barsu Refinery Project) राज्यातील राजकारण तापलं होतं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात यावरून आरोप – प्रत्यारोप सुरु होते. कोकणातील राजापूर तालुक्यातील सोलगाव बारसू परिसरात क्रूड ऑईल रिफायनींग करण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलियमन उद्योग हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित असून या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी माती परिक्षण करण्यास सुरुवात झाली, मात्र याला स्थानिक गावकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला. त्यानंतर या माती परिक्षणावरून स्थानिक आणि पोलिसांमध्ये वाद सुरु झाले. त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं होतं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.