Manoj Jarange Patil : अखेर जरांगे पाटलांनी घेतलं सलाईन; लवकरच घेणार पुढचा निर्णय

सरकारने योग्य कारण दिलं तर दोन काय चार पावले मागे यायला तयार

85
Manoj Jarange Patil : अखेर जरांगे पाटलांनी घेतलं सलाईन; लवकरच घेणार पुढचा निर्णय

एकीकडे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी दिलेली ४ दिवसांची मुदत संपताच (Manoj Jarange Patil) उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (१० सप्टेंबर) सलाइन काढली तसेच पाणी पिणेही बंद केले. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी सोमवार ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. अशातच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत चालली असून त्यांनी सलाईन लावावे असा आग्रह गावकऱ्यांनी केला होता. त्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन घेतले आहे. डॉक्टरांच्या पथकाने काल रात्री म्हणजेच सोमवार ११ सप्टेंबर रोजी साडेबारा वाजता तपासणी करुन, (Manoj Jarange Patil) जरांगे पाटील यांना सलाईन लावले. दरम्यान, मंगळवार ११ सप्टेंबर सकाळी १० वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. तर दुपारी दोन वाजता ते सर्व समाजबांधवांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत.

काय म्हणाले जरांगे पाटील?

सलाईन लावतांना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की; “माझं गाव भावनिक झालं आहे. गावातील महिला रडत आहेत, ते जरा काळजाला लागतंय. माझ्यात निर्णय घ्यायला क्षमताच राहिलेली नाही. सरकारला वेळ का पाहिजे हे कळले पाहिजे. सरकारने योग्य कारण दिलं तर दोन काय चार पावले मागे यायला तयार असल्याचे पाटील म्हणाले. आरक्षण खरंच देणार का याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

(हेही वाचा – Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती)

मनोज पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे – सर्वपक्षाची विनंती

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत आणि त्यादृष्टीने ठोस पावले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती सोमवारी (११ सप्टेंबर) सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना केली. सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठा समाजास आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी या आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.