ED on I.n.d.i.a. alliance: इंडिया आघाडीच्या ‘या’ नेत्यांवर लवकरच ईडीच्या कारवाईची शक्यता, राजकीय वर्तुळात उलथापालथ

इंडिया आघाडीमध्ये एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर येत्या काळात संकटे कोसळण्याचे भाकीत

121
ED on I.n.d.i.a. alliance: इंडिया आघाडीच्या 'या' नेत्यांवर लवकरच ईडीच्या कारवाईची शक्यता, राजकीय वर्तुळात उलथापालथ
ED on I.n.d.i.a. alliance: इंडिया आघाडीच्या 'या' नेत्यांवर लवकरच ईडीच्या कारवाईची शक्यता, राजकीय वर्तुळात उलथापालथ

देशातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीतील काही बड्या नेत्यांवर आता ईडीची कारवाई होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यामुळे येत्या काळात देशपातळीवरील राजकारणामध्ये चांगलीच उलथापालथ होणार असल्याचेही म्हटले जात आहे.

ईडीचे संचालक संजय मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदत वाढीचे शेवटचे चार दिवस उरले आहेत. यानंतर त्यांची नियुक्ती ईडी व सीबीआय दरम्यान समन्वय अधिकारी सी.आय.ओ अशी करण्यात आली आहे.यामुळे येत्या काळात इंडिया आघाडीतील बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर येत्या काळात संकटे कोसळण्याचे भाकीत राजकीय वर्तुळात वर्तवले जात आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : पक्ष रजिस्टर झाला नाही म्हणून मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीत बाजू मांडून बाहेर – संभाजीराजांचा खुलासा )

यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ईडीच्या रडावर आहेत तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सुरेन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या कन्या कविता, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी, काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर ईडी येत्या काही दिवसांत कारवाई करू शकते असे म्हटले जात आहे. ईडीचे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच ही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.